TRENDING:

Weather Alert: कोकणात पावसाचं तुफान; ठाणे, नवी मुंबईला झोडपणार, या जिल्ह्यांत हायअलर्ट

Last Updated:
Mumbai Rain: कोकणात पावसाचा जोर वाढला असून उत्तर कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. आज ठाणे, नवी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
कोकणात पावसाचं तुफान; ठाणे, नवी मुंबईला झोडपणार, या जिल्ह्यांत हायअलर्ट
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. मुंबईपासून रायगडपर्यंत अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सप्टेंबरची सुरुवातच मुसळधार पावसाने झाली असल्याने सणासुदीच्या तयारीत असलेल्या नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होत आहे. हवामान विभागाने आजही काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काहींना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर पावसाच्या सरी सुरू राहणार आहेत. काही भागांमध्ये हलक्या सरी पडतील तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे. समुद्रावर वारे मध्यम ते जोरदार वेगाने वाहणार आहेत.
advertisement
3/5
नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात दिवसभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर पाणी साचणे, रेल्वे व रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असून, वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 35 किमीपर्यंत जाऊ शकतो.
advertisement
4/5
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आज रायगडला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तापमान 24 ते 28 अंशांच्या दरम्यान राहील. दमट हवामानामुळे नागरिकांना उकाडा जाणवू शकतो.
advertisement
5/5
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी आहे. म्हणजेच, या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल तर काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. समुद्रावर भरतीची स्थिती राहील त्यामुळे मच्छीमारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 25 अंशांच्या आसपास राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात पावसाचं तुफान; ठाणे, नवी मुंबईला झोडपणार, या जिल्ह्यांत हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल