Weather Alert: 48 तास धोक्याचे! कोकणात पावसाचा जोर, मुंबईला यलो, तर ठाण्यात हायअलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: सप्टेंबरच्या पहिल्याच आठवाड्यात कोकणातील पावसाचा जोर कायम आहे. आज ठाण्यासह 3 जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/5

सप्टेंबर महिना सुरू होऊन अवघे चार दिवस झाले असले तरी कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, मुंबई व परिसरात विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
2/5
आज मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत अधूनमधून मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. सकाळपासून वातावरण ढगाळ राहील, दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. तापमान 25 ते 30 अंश सेल्सियस दरम्यान राहील.
advertisement
3/5
पालघर जिल्ह्यालाही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथे जमिनीतील ओल वाढली आहे. आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी रिमझिमसरी सुरू आहेत आणि दुपारनंतर जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 35 किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
4/5
रायगड जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-ओढे खळखळत आहेत. आजदेखील मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 35 किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आज सरासरी तापमान 24 ते 29 अंश सेल्सियस राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: 48 तास धोक्याचे! कोकणात पावसाचा जोर, मुंबईला यलो, तर ठाण्यात हायअलर्ट