आजचं हवामान: तळकोककणात पारा घसरला, मुंबई, ठाण्यात हुडहुडी, तापमान 20 अंशांच्या खाली
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पावसाने उघडीप घेतल्यानंतर मुंबईसह कोकणात गारठा वाढत आहे. तळकोकणात पारा घसरल्याचे चित्र असून मुंबईत देखील तापमानात घट झालीये.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाने ब्रेक घेतल्यानंतर गारठा वाढला आहे. मुंबईसह कोकणात देखील तापमानात मोठी घट झालीये. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत असून पारा 20 अंशांच्या खाली आला आहे. तर हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज आकाश स्वच्छ असून हवामान कोरडे राहणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा जोर वाढला आहे. तापमानाचा पारा 18 ते 20 अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. तर दुपारी तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. दिवसभर ऊन कायम राहणार असले तरी सकाळी आणि रात्री तापमानात दोन दिवस मोठी घट होणार आहे.
advertisement
3/5
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरात मात्र थंडीने चांगलीच झडप घातली आहे. सकाळी आणि संध्याकाळी हवेत गारवा वाढला असून, काही ठिकाणी लोकांना हुडहुडी भरू लागली आहे. रात्री तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत आहे. दिवसभर उन्हाचे प्रमाण जास्त असले तरी संध्याकाळी गार वाऱ्याची झुळूक थंडीची खरी जाणीव करून देत आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यातही आता थंडीची चाहूल लागली असून, ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी थंडीचा अनुभव घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळी धुकं दिसत असून, रात्री थंड वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. हवामान कोरडे असून दिवसभर ऊन आहे, मात्र संध्याकाळी वातावरण थंड होतंय.
advertisement
5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये देखील आता थंडीची सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गात 14 अंशांपर्यंत तापमान नोंदवले गेले. आज देखील गारठा कायम राहील. सकाळी शेतांवर धुक्याचे सावट दिसत आहेत, तर रात्री थंड वाऱ्यामुळे ग्रामीण भागात तापमान झपाट्याने खाली येत आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकांसाठी पोषक हवामान झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
आजचं हवामान: तळकोककणात पारा घसरला, मुंबई, ठाण्यात हुडहुडी, तापमान 20 अंशांच्या खाली