Weather Alert: बंगालच्या उपसागरात वारं फिरलं, मुंबई-ठाण्याला वादळी पावसानं घेरलं, IMD चा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून ऑक्टोबरअखेर पावसाचा जोर वाढला आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीही महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ या चक्रीवादळाचा परिणाम आता राज्यात स्पष्टपणे जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पाऊस सतत सुरू असून, आता हवामान विभागानं मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
मंगळवारी दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं आणि काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. आजही मुंबई शहर आणि उपनगरात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुपारनंतर आभाळ भरून येईल आणि सायंकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत पावसाचा जोर दिसून येतोय. मंगळवारी झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती. आज पुन्हा हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट दिला असून, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक ग्रामीण भागांमध्ये पावसामुळे लहान नद्यांना पूर आला आहे, तर काही शहरी भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. आजही या जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने पाऊस आणि वारे अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरुच आहे. काही भागात हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आजही हवामान विभागानं या तीनही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत 30 ते 40 किमी, तर सिंधुदुर्गात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने पाऊस आणि वारे राहतील असा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा पाऊस चिंतेचा विषय बनला आहे कारण भात कापणीचं काम विलंबाने होतंय आणि ओलसर हवामानामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: बंगालच्या उपसागरात वारं फिरलं, मुंबई-ठाण्याला वादळी पावसानं घेरलं, IMD चा अलर्ट