TRENDING:

एका अभिनेत्रीची एक्झिट, दुसरीची एन्ट्री! 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत दिसणार 90sची एव्हरग्रीन हिरोईन

Last Updated:
New Actress in Yed Lagla Premach : येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. तर लगेचच दुसऱ्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
advertisement
1/8
एका अभिनेत्रीची एक्झिट, दुसरीची एन्ट्री! 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत दिसणार 90sची एव्हरग्रीन हिरोईन
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'येड लागलं प्रेमाचं' सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे.
advertisement
2/8
कथानकात दररोज नवे ट्विस्ट आणि रहस्य उलगडत असताना प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवणारी एक खास एन्ट्री मालिकेत होणार आहे.
advertisement
3/8
मालिकेत जीजीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं. जीजीची भूमिका अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी साकारली होती.
advertisement
4/8
जीजीचा मृत्यूमुळे त्यांची मालिकेतील भूमिका संपली आहे. नीना कुळकर्णी यांनी येड लावलं प्रेमाचं या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
advertisement
5/8
दरम्यान येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून एका अभिनेत्री एक्झिट तर दुसरीची एन्ट्री होत आहे. नीना कुळकर्णींच्या एक्झिटनंतर 90s आणखी एक दमदार अभिनेत्री मालिकेत एन्ट्री करत आहे. तिचा पहिला लूक समोर आला आहे
advertisement
6/8
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप पाडलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे-विज आता या येड लागलं प्रेमाचं मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. किशोरी शहाणे-विज या मालिकेत इंद्रायणी धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहेत. इंद्रायणी धर्माधिकारी या पोलीस स्पेशल सेलच्या हेड असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुंतागुंतीच्या केसेस यशस्वीपणे सोडवल्या आहेत.
advertisement
7/8
अत्यंत करारी, स्पष्टवक्ती आणि धाडसी स्वभाव असलेल्या इंद्रायणी तितक्याच संवेदनशील आणि प्रेमळही आहेत. कोणतीही परिस्थिती असो, कितीही अडथळे आले तरी त्यातून मार्ग काढण्याची त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास त्यांना वेगळं ठरवतो.
advertisement
8/8
इंद्रायणी धर्माधिकारी यांच्या येण्याने रायाच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.  येड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री 11 वाजता टेलिकास्ट होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एका अभिनेत्रीची एक्झिट, दुसरीची एन्ट्री! 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत दिसणार 90sची एव्हरग्रीन हिरोईन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल