TRENDING:

Weather Update: नाशिक ते संभाजीनगर थंडीची लाट, मुंबईत-ठाण्यात पारा घसरला, कोकणात काय स्थिती?

Last Updated:
Weather Alert: उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील 2 दिवस थंडीची लाट आहे. मुंबईसह कोकणात देखील हवामानात बदल जाणवत असून आजचं अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
नाशिक ते संभाजीनगर थंडीची लाट, मुंबईत-ठाण्यात पारा घसरला, कोकणात काय स्थिती?
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> महाराष्ट्रात 16 नोव्हेंबर रोजी हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. राज्यातील काही भागात थंडीची लाट आली आहे. तसेच काही जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र कोकण–किनारपट्टीवर पावसाची शक्यता नाही, तर हा भाग दिवसभर कोरडा राहणार आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात ‘कोल्ड वेव्ह’चं संकट असून मुंबईसह कोकणातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबईत 15 नोव्हेंबर रोजी सकाळी आणि संध्याकाळी चांगलीच थंडी जाणवत होती. किमान तापमान साधारण 19 ते 20 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आणि दिवसा तापमान 28 अंशांच्या आसपास होते. आज 16 नोव्हेंबरलादेखील मुंबईत दिवसा हलके ऊन आणि दुपारी मध्यम उकाडा अशी स्थिती राहील, मात्र संध्याकाळी पुन्हा गारठा वाढेल. त्यामुळे ‘हिवाळ्याची झलक’ मुंबईकरांना आता दररोज जाणवू लागली आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई येथेही थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. संध्याकाळी तापमान पटकन खाली उतरल्याने गारवा अधिक जाणवतो आहे. गुरुवारी रात्री 17–19°C नोंदले गेले असून, सकाळीही हवा किंचित थंड आहे. दिवसा तापमान 25–27°C च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. कल्याण–डोंबिवली परिसरातही थंडी अपेक्षेपेक्षा जास्त जाणवू लागली असून, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात पावसाने पूर्ण वेळ विश्रांती घेतली असून हवामान आता स्थिर व कोरडे झाले आहे. 16 नोव्हेंबरला दिवसा तापमान अंदाजे 24 ते 25 अंशांच्या आसपास राहील आणि दुपारी हलका उकाडा जाणवेल. मात्र सकाळी आणि सायंकाळी थंडीचा जोर वाढेल आणि तापमान 19 ते 20 अंशांच्या आसपास किंवा त्याखालीही जाऊ शकते. कोकणाच्या उत्तरेकडील भागात असल्यामुळे पालघरमध्ये थंडीची तीव्रता जाणवत आहे.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत आज हवामान पूर्णपणे कोरडे राहील. पावसानंतरचा ओलावा कमी झाल्याने या किनारपट्टी भागांत सकाळ-संध्याकाळ गारवा वाढू लागला आहे. दिवसा तापमान साधारण 24 ते 26 अंशांदरम्यान राहील, तर रात्री तापमान 17 ते 19 अंशांपर्यंत खाली उतरण्याचा अंदाज आहे. ग्रामीण व किनारी भागांत थंडीचा कडाका जाणवत आहे. विशेषत: महाड, चिपळूण, देवरुख, मालवण आणि कुडाळ परिसरात गारठा वाढला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Update: नाशिक ते संभाजीनगर थंडीची लाट, मुंबईत-ठाण्यात पारा घसरला, कोकणात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल