TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, पुन्हा थंडीची लाट येणार? हवामान खात्याकडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
अवकाळी पावसानंतर आता ढगाळ वातावरण कायम असून थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे. अशा पार्श्वभूमीवर सोमवारी, 5 जानेवारी रोजी या भागांत हवामान कसं असेल, ते पाहूया.
advertisement
1/5
महाराष्ट्रातील हवामानात बदल, थंडीची लाट येणार?हवामान खात्याकडून महत्त्वाचं अपडेट
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुणे या प्रमुख भागांत काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर आता ढगाळ वातावरण कायम असून थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे. अशा पार्श्वभूमीवर सोमवारी, 5 जानेवारी रोजी या भागांत हवामान कसं असेल, ते पाहूया.
advertisement
2/5
कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात सोमवारी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी हलकं धुके जाणवू शकतं. गेल्या काही दिवसांतील कडाक्याची थंडी सध्या कमी झाली असून गारवा सौम्य स्वरूपात राहील. मुंबई शहरात किमान तापमान सुमारे 19 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतही साधारण अशीच हवामानस्थिती राहणार असून पुढील काही दिवसांत कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहर आणि परिसरात ढगाळ हवामानाचा प्रभाव जाणवत आहे. धुक्यामुळे आणि ढगांमुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा तीव्रपणा कमी झाला आहे. पुणे शहरात सोमवारी सकाळी धुके राहील, तर दिवसभर वातावरण ढगाळ ते अंशतः स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पहाटे गारवा जाणवेल, मात्र दिवसा तापमान वाढल्याने थंडी कमी भासेल.
advertisement
4/5
मराठवाडा आणि विदर्भात हवामानाची स्थिती थोडी वेगळी राहणार आहे. मराठवाड्यात सोमवारी ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, दिवस सरताच आकाश हळूहळू स्वच्छ होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहणार आहे. विदर्भात ढगाळ वातावरण निवळत असून हवामान कोरडं राहील. अमरावतीसारख्या भागांत किमान तापमान सुमारे 14 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढग हटल्याने या भागांत पुढील काळात थंडीचा जोर पुन्हा वाढू शकतो.
advertisement
5/5
एकंदरीत, 5 जानेवारी रोजी राज्यात ढगाळ हवामानाचा प्रभाव जाणवेल आणि त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी राहील. मात्र, पुढील दोन दिवसांत आकाश स्वच्छ होताच रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात हलकी वाढ होत असली तरी किमान तापमानात मोठा बदल होणार नाही, अशी स्थिती पुढील काही दिवस टिकून राहू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, पुन्हा थंडीची लाट येणार? हवामान खात्याकडून महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल