TRENDING:

त्या महिलेच्या त्रासाला कंटाळला; रेल्वेखाली येत तरुणाने संपवलं जीवन, सोशल मिडिया पोस्टमुळे मोठा खुलासा

Last Updated:

रामदास हे येवलेवाडी परिसरातील एका सलूनमध्ये कारागीर म्हणून कामाला होते. सलूनची मालकीण शीतल काळे हिच्यासोबत त्यांचा काही कारणावरून वाद झाला होता

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोंढवा-येवलेवाडी भागात एका तरुणाने रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह एकूण सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पाच लाखांची मागणी आणि पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याने या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
तरुणाने संपवलं जीवन (AI Image)
तरुणाने संपवलं जीवन (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

रामदास भरत पवार (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामदास हे येवलेवाडी परिसरातील एका सलूनमध्ये कारागीर म्हणून कामाला होते. सलूनची मालकीण शीतल काळे हिच्यासोबत त्यांचा काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रृती कन्हेरे, ऋषी कन्हेरे आणि मोहन सोनार या सात जणांनी मिळून रामदास यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

advertisement

आरोपींनी रामदास यांना "आम्ही तुझी पोलिसात तक्रार करू" अशी धमकी दिली होती. ही तक्रार टाळण्यासाठी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या सततच्या मानसिक छळाला आणि धमकीला कंटाळून रामदास यांनी ३० डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेल सारखी चिकन तंदुरी, आता सोप्या पद्धतीने बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

आत्महत्या करण्यापूर्वी रामदास यांनी आपल्या वहीत आणि सोशल मीडियावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी आरोपींच्या त्रासामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच त्यांनी आपल्या बहिणीलाही या छळाबाबत कल्पना दिली होती. याप्रकरणी रामदास यांची बहीण रूपाली संतोष पुजारी यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
त्या महिलेच्या त्रासाला कंटाळला; रेल्वेखाली येत तरुणाने संपवलं जीवन, सोशल मिडिया पोस्टमुळे मोठा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल