Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! कल्याण-डोंबिवलीत गारठा आणखी वाढणार, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उत्तर दिशेकडून थंड वारे वाहत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे, त्यामुळे ठाण्यातही थंडीचा कडाका जाणवून पारा 10 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. 5 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली शहरातील हवामान स्थिती काय असेल पाहुयात.
advertisement
1/5

मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत असताना, काही भागांमध्ये झालेल्या पावसाने हवामानातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला असून ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवली. उत्तर दिशेकडून थंड वारे वाहत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे, त्यामुळे ठाण्यातही थंडीचा कडाका जाणवून पारा 10 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. 5 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली शहरातील हवामान स्थिती काय असेल पाहुयात.
advertisement
2/5
काही दिवसांपासून हवामात वेगवेगळे रंग बघायला मिळतात. कल्याण तालुक्यात 5 जानेवारी थंडीची लाट कायम असून, हवामान कोरडे आणि आल्हाददायक राहील,ज्यात किमान तापमान 19 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल, सकाळी गारठा तर दुपारनंतर उष्णता जाणवेल.पण संध्याकाळी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडी जाणवेल.हवामानातील या बदलांमुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका असू शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
3/5
डोंबिवली शहरात आज हलके धुके आणि सुखद थंडी जाणवेल, किमान तापमान 22अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 32अंश सेल्सिअस च्या आसपास राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिवसा ऊबदार आणि रात्री गारठा जाणवेल. वातावरण बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात 5 जानेवारी हवामान स्वच्छ किंवा अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पहाटे आणि रात्री थंडी जाणवेल त्यामुळे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस ते किमान 20 अंश सेल्सिअस असेल,बदलत्या वातावरणानुसार हवेत थोडी आर्द्रता आणि प्रदूषण (AQI) असू शकते, त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे आणि आरोग्याविषयी खबरदारी घेणे आवश्यक आहे .
advertisement
5/5
कालच्या तुलनेत आज 5 जानेवारी बदलापूरमध्ये पारा चांगलाच घसरला असून हवामान स्वच्छ आणि थंड राहण्याची शक्यता आहे, ज्यात किमान तापमान 9 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत असू शकते, ज्यामुळे दिवसा ऊबदार आणि रात्री थंडावा जाणवेल. मुरबाड शहापूर तालुक्यातील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असल्याने हवेत आर्द्रता कमी झाल्याने वाऱ्याचा वेग मंद राहील, जे बाहेर फिरण्यासाठी किंवा शेतीकामासाठी अनुकूल वातावरण राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! कल्याण-डोंबिवलीत गारठा आणखी वाढणार, हवामान खात्याकडून अलर्ट