TRENDING:

योगायोग की…! 12 राशींचं 12 ज्योतिर्लिंगांशी आहे खास कनेक्शन, कोणत्या राशींनी घ्यावं कोणत्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन?

Last Updated:
हिंदू धर्मशास्त्रात भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, या 12 स्थानांवर महादेव स्वतः ज्योतिस्वरूपात विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा संबंध एका विशिष्ट ज्योतिर्लिंगाशी जोडला गेला आहे.
advertisement
1/13
12 ज्योतिर्लिंग आणि 12 राशी, कोणत्या राशींनी घ्यावं कोणत्या ज्योतिर्लिंगाच दर्शन
हिंदू धर्मशास्त्रात भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, या 12 स्थानांवर महादेव स्वतः ज्योतिस्वरूपात विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा संबंध एका विशिष्ट ज्योतिर्लिंगाशी जोडला गेला आहे. आपल्या राशीनुसार संबंधित ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि उपासना केल्याने ग्रहांचे दोष दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
advertisement
2/13
मेष (Aries) - रामेश्वरम, तामिळनाडू: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, परंतु या राशीत सूर्य उच्च होतो. रामेश्वरमची स्थापना प्रभू रामाने केली होती, जे सूर्यवंशी होते. मेष राशीच्या व्यक्तींनी येथे दर्शन घेतल्याने वैवाहिक जीवनातील कलह दूर होतात आणि आत्मविश्वासात वाढ होते.
advertisement
3/13
वृषभ (Taurus) - सोमनाथ, गुजरात: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि चंद्राचे हे लाडके स्थान आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा संबंध चंद्राशी आहे. वृषभ राशीच्या लोकांनी येथे दर्शन घेतल्याने मानसिक शांती लाभते आणि आर्थिक भरभराट होते.
advertisement
4/13
मिथुन (Gemini) - नागेश्वर, गुजरात: मिथुन राशीत राहू उच्च मानला जातो आणि नागेश्वर हे नागांचे (राहूचे प्रतीक) स्थान आहे. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मिथुन राशीच्या व्यक्तींमधील द्विधा मनस्थिती दूर होऊन निर्णयक्षमता सुधारते.
advertisement
5/13
कर्क (Cancer) - ओंकारेश्वर, मध्य प्रदेश: कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ओंकारेश्वर हे 'ओम' आकाराच्या बेटावर वसलेले आहे. कर्क राशीच्या लोकांनी येथे दर्शन घेतल्याने त्यांना भावनिक स्थिरता मिळते आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतात.
advertisement
6/13
सिंह (Leo) - त्र्यंबकेश्वर, नाशिक: सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचे वास्तव्य आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी येथे दर्शन घेतल्याने त्यांना पितृदोषातून मुक्ती मिळते आणि समाजात मान-सन्मान वाढतो.
advertisement
7/13
कन्या (Virgo) - मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश: कन्या राशीच्या व्यक्तींनी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. यामुळे त्यांच्या बुद्धीचा विकास होतो आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात यश मिळते.
advertisement
8/13
तूळ (Libra) - महाकालेश्वर, उज्जैन: तूळ रास ही संतुलनाचे प्रतीक आहे. महाकाल हे काळाचे अधिपती आहेत. तुला राशीच्या लोकांनी येथे दर्शन घेतल्याने अकाली मृत्यूचे भय संपते आणि जीवनात संतुलन येते.
advertisement
9/13
वृश्चिक (Scorpio) - घृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर: वृश्चिक रास ही गूढ आणि आध्यात्मिक रास आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील संकटे दूर होतात आणि रखडलेली कामे मार्गी लागतात.
advertisement
10/13
धनु (Sagittarius) - काशी विश्वनाथ, वाराणसी: धनु राशीचा स्वामी गुरु आहे. काशी ही ज्ञानाची नगरी आहे. येथे दर्शन घेतल्याने धनु राशीच्या व्यक्तींना मोक्ष आणि आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते.
advertisement
11/13
मकर (Capricorn) - भीमशंकर, महाराष्ट्र: मकर राशीचा स्वामी शनी आहे. भीमशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मकर राशीच्या लोकांवरील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि त्यांना कार्यात यश मिळते.
advertisement
12/13
कुंभ (Aquarius) - केदारनाथ, उत्तराखंड: कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे. केदारनाथ हे हिमालयातील अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे दर्शन घेतल्याने कुंभ राशीच्या व्यक्तींच्या मनातील भीती नष्ट होते आणि त्यांना जीवनाचे सत्य समजते.
advertisement
13/13
मीन (Pisces) - वैद्यनाथ, झारखंड: मीन राशीच्या व्यक्तींनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात आणि मनाला अपार शांती मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
योगायोग की…! 12 राशींचं 12 ज्योतिर्लिंगांशी आहे खास कनेक्शन, कोणत्या राशींनी घ्यावं कोणत्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल