राज्यात 32.78 लाख नवीन वाहनांची नोंद
केंद्र सरकारने शेवटच्या टप्प्यात जीएसटी कमी केल्याने वाहन खरेदीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली . जीएसटी कमी झाल्याने अनेक नागरिकांनी नव्या वाहनांची खरेदी केली. यांचा थेट फायदा वाहन विक्रीत झाला .2025 या वर्षात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये एकूण 32.78 लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश असून 22.92 लाख दुचाकी वाहने नोंदली गेली आहेत. यानंतर 5.05 लाख कारची नोंद झाली आहे.
advertisement
Mumbai : ग्राहकांनो लक्ष द्या! स्मार्ट मीटर वापरल्यावर वीज बिलावर मिळणार थेट कपात; पण कसं?
कृषी कामासाठी वापरला जाणाऱ्या 1.46 लाख ट्रॅक्टरची खरेदी झाली आहे. तसेच 1.35 लाख अवजड वाहनांची नोंद झाली आहे.याशिवाय 88 हजार 352 रिक्षा, 57 हजार 159 इतर वाहने आणि 13 हजार 346 बस नव्याने नोंदवण्यात आल्या आहेत.2024 मध्ये राज्यात 28. 87 लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली होती.
वाहन खरेदीत नागरिकांचा कल दुचाकींकडे अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पुणे शहरात गेल्या एका वर्षात 2.11 लाखांहून अधिक दुचाकींची नोंदणी झाली आहे.
लाखांहून अधिक वाहन नोंदणी झालेले आरटीओ
2025 मध्ये राज्यातील काही आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन नोंदणी लाखांच्या पुढे गेली आहे. पुणे आरटीओमध्ये सर्वाधिक 3,31,488 वाहनांची नोंद झाली आहे. मुंबई आरटीओमध्ये 3,20,000, पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये 2,17,728, नाशिक आरटीओमध्ये 1,42,633, ठाणे आरटीओमध्ये 1,17,705, वसई आरटीओमध्ये 1,04,728 आणि कल्याण आरटीओमध्ये 1,02,153 वाहनांची नोंद झाली आहे.






