Maruti ची टँकसारखी SUV, मायलेज देतेय तब्बल 28 किमी, फिचर्स पाहून बूक कराल Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
भारतीय बाजारात हायब्रिड वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मारुती सुझुकीने Maruti Victoris Hybrid बाजारात आणली असून ती सध्या देशातील सर्वात परवडणारी हायब्रिड SUV ठरली आहे.
मुंबई : पेट्रोलचे वाढते दर आणि इंधन बचतीची गरज लक्षात घेता, भारतीय बाजारात हायब्रिड वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मारुती सुझुकीने Maruti Victoris Hybrid बाजारात आणली असून ती सध्या देशातील सर्वात परवडणारी हायब्रिड SUV ठरली आहे. पण ही हायब्रिड गाडी नेमकी कशी काम करते आणि तिचं वेगळेपण काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
हायब्रिड गाडी म्हणजे काय?
advertisement
हायब्रिड गाडी म्हणजे अशी गाडी जी दोन शक्ती स्रोतांवर चालते –
1) पेट्रोल इंजिन
advertisement
2). इलेक्ट्रिक मोटर
advertisement
Maruti Victoris मध्ये Strong Hybrid सिस्टम वापरण्यात आली आहे. म्हणजेच ही गाडी कमी वेगात किंवा ट्रॅफिकमध्ये फक्त इलेक्ट्रिक मोटरवरही चालू शकते. त्यामुळे पेट्रोलची बचत होते आणि प्रदूषणही कमी होते.
advertisement
Victoris मधील हायब्रिड सिस्टम कशी काम करते?
advertisement
1) Victoris मध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिनसोबत एक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर दिली आहे.
advertisement
2) गाडी सुरू करताना आणि हळू वेगात चालताना ती फक्त इलेक्ट्रिक मोडवर चालते.
3) वेग वाढला की पेट्रोल इंजिन आपोआप सुरू होतं.
4) ब्रेक लावल्यावर किंवा गाडीचा वेग कमी झाल्यावर बॅटरी आपोआप चार्ज होते (Regenerative Braking).
यामुळे वेगळी चार्जिंगची गरज लागत नाही आणि गाडी आपोआप स्मार्ट पद्धतीने पॉवर वापरते.
मायलेजमध्ये सगळ्यांपेक्षा पुढे
या हायब्रिड सिस्टममुळे Maruti Victoris 28.65 kmpl इतकं जबरदस्त मायलेज देते. शहरातील ट्रॅफिकमध्ये जिथे पेट्रोल गाड्या जास्त इंधन खर्च करतात, तिथे Victoris इलेक्ट्रिक मोडवर चालून मोठी बचत करून देते.
किंमत आणि परवडणारा पर्याय
Maruti Victoris Hybrid ची एक्स-शोरूम किंमत
₹16.38 लाख ते ₹19.99 लाख
या किंमतीत ती Maruti Grand Vitara Hybrid आणि Toyota Hyryder Hybrid पेक्षा स्वस्त ठरते. कमी किंमतीत हायब्रिड टेक्नॉलॉजी मिळत असल्याने ही SUV मध्यमवर्गीय ग्राहकांसाठीही परवडणारी ठरते.
फीचर्स – टेक्नॉलॉजीने भरलेली SUV
Victoris मध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, Alexa व्हॉइस कंट्रोल, 60+ कनेक्टेड कार फीचर्स, ही SUV फक्त मायलेजसाठी नाही तर आरामदायक आणि स्मार्ट ड्रायव्हिंगसाठीही तयार करण्यात आली आहे.
सेफ्टी आणि ADAS टेक्नॉलॉजी
Maruti Victoris ही मारुतीची ADAS असलेली पहिली SUV आहे.
ADAS म्हणजे ड्रायव्हरला मदत करणारी स्मार्ट सिस्टम. यात ऑटोमॅटिक ब्रेकिंग, लेनमध्ये गाडी ठेवणारी सिस्टम, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट अलर्ट, यासोबतच 6 एअरबॅग्स आणि 5-स्टार सेफ्टी रेटिंग असल्याने सुरक्षिततेच्या बाबतीतही ही SUV मजबूत आहे.
शहरासाठीही आणि रफ वापरासाठीही योग्य
Victoris मध्ये ALLGRIP ऑल-व्हील ड्राइव्ह आणि मल्टी-टेरेन मोड असल्याने ती केवळ शहरापुरती मर्यादित राहत नाही. खराब रस्ते, पावसाळी रस्ते किंवा हलकं ऑफ-रोडिंगही ही SUV सहज हाताळू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 4:33 PM IST










