BBM6 मध्ये दिसणारी सुंदरी कोण? प्रोमोमध्ये दिसली पहिली झलक, हिंदी BIGG BOSS मध्येही घातला होता धिंगाणा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीने नुकताच एका महिला स्पर्धकाचा टीझर रिलीज केला आणि अवघ्या काही तासांतच चाहत्यांनी त्या चेहऱ्यामागचं रहस्य उलगडलं असल्याचा दावा केला आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या घराघरात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे 'बिग बॉस मराठी ६'. ११ जानेवारी २०२६ पासून हा धमाकेदार शो आपल्या भेटीला येतोय. पण शो सुरू व्हायच्या आधीच सोशल मीडियावर एका प्रोमोने आग लावली आहे. कलर्स मराठीने नुकताच एका महिला स्पर्धकाचा टीझर रिलीज केला आणि अवघ्या काही तासांतच चाहत्यांनी त्या चेहऱ्यामागचं रहस्य उलगडलं असल्याचा दावा केला आहे.
प्रोमोतला तो ग्लॅमरस चेहरा कोणाचा?
रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये एक अतिशय ग्लॅमरस महिला साडी नेसून दिमाखात उभी असलेली दिसतेय. बॅकग्राउंडला "फॅशनच्या जगातील ही सुंदरी, भल्याभल्यांवर पडणार भारी!" असं दमदार वाक्य ऐकू येतंय. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा प्रोमो AI जनरेटेड असल्याचंही म्हटलं आहे. असं असलं तरी चाहत्यांच्या नजरेतून काहीच सुटलेलं नाही. अनेकांनी कमेंट्समध्ये एकाच नावाचा जप सुरू केला आहे, ते नाव म्हणजे सोनाली राऊत!
advertisement
advertisement
कोण आहे ही सोनाली राऊत?
जर सोनाली राऊत खरोखरच बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार असेल, तर यंदाचं पर्व हॉट आणि हॅपनिंग होणार यात शंका नाही. सोनालीने सलमान खानच्या 'बिग बॉस ८' मध्ये आपल्या बोल्ड आणि बिनधास्त वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ती या खेळातील एक जुनी आणि अनुभवी खेळाडू आहे. इतकंच नाही, तर 'द एक्सपोज' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' यांसारख्या चित्रपटांतून तिने आपली ग्लॅमरस ओळख निर्माण केली आहे.
advertisement
काही नेटकऱ्यांनी ही अभिनेत्री उर्मिला निंबाळकर असावी असाही अंदाज लावला आहे, पण सोनाली राऊतच्या नावाची चर्चा सध्या सगळ्यात जास्त आहे.
यंदाच्या घरात कोण-कोण असणार?
यंदाच्या पर्वात काही तगडे स्पर्धक दिसणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. यामध्ये विनोदाचा बादशाह सागर कारंडे, राजकारण आणि अभिनयसृष्टीतील डॅशिंग चेहरा दीपाली सय्यद, मालिका विश्वातील चॉकलेट बॉय संकेत पाठक, 'शाळा' फेम अभिनेत्री अनुश्री माने, लावणी डान्सर राधा मुंबईकर आणि रसिका जामसुदकर या नावांची तुफान चर्चा आहे.
advertisement
कधी आणि कुठे पाहाल बिग बॉस मराठी ६?
आता या प्रोमोमधली ती गूढ सुंदरी सोनाली राऊतच आहे की आणखी कोणी, यावरून ११ जानेवारीला पडदा उठेल. रितेश देशमुख पुन्हा एकदा 'भाऊचा धक्का' देण्यासाठी सज्ज होणार आहे. रविवार, ११ जानेवारी रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर या तुफान शोला सुरुवात होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 4:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM6 मध्ये दिसणारी सुंदरी कोण? प्रोमोमध्ये दिसली पहिली झलक, हिंदी BIGG BOSS मध्येही घातला होता धिंगाणा











