गारटकरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, अजितदादांकडून बारामतीच्याच विश्वासू माणसावर जबाबदारी, पुणे जिल्ह्याचा कारभारी ठरला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
संभाजी नाना होळकर हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
मुंबई : इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरून तत्कालिन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि अजित पवार यांच्यातील संबंध ताणले होते. नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी प्रदीप गारटकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. निवडणुकीनंतर गारटकर हे अजित पवार यांच्याशी जुळवून घेऊन पुन्हा राजकारणाला सुरुवात करतील, असे वाटत होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. असे असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी संभाजी नाना होळकर यांच्याकडे सोपवली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी संभाजी होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली. होळकर यांच्या खांद्यावर बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर तालुक्याची जबाबदारी देण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
संभाजी नाना होळकर-पुणे जिल्ह्याचा पक्षाचा कारभारी
संभाजी होळकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असून आपणावर बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांची जबाबदारी देण्यात येत आहे. तरी पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा, असे प्रसिद्धीपत्रकात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. होळकर हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे जिल्ह्याचे कारभारीपद देण्याचे अजित पवार यांनी ठरवले.
advertisement
कोण आहेत संभाजी होळकर?
संभाजी नाना होळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती तालुक्याची जबाबदारी होती
संभाजी होळकर हे राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते
गेल्या २० ते २५ वर्षांपासून होळकर अजित पवार यांच्यासोबत काम करतात
विशेष म्हणजे पक्षफुटीच्या कठीण काळातही त्यांनी अजित पवार यांची साथ निभावली
प्रदीप गारटकर पक्षात असताना त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होते
advertisement
परंतु ते पक्षातून गेल्यानंतर होळकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 4:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गारटकरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, अजितदादांकडून बारामतीच्याच विश्वासू माणसावर जबाबदारी, पुणे जिल्ह्याचा कारभारी ठरला










