संभाजीनगरमधील हल्ल्यनंतर जलील माध्यमांसमोर, थेट हल्लेखोराच्या आकांची नावं घेतली

Last Updated:

गुंडगिरी तुम्हाला करायची असेल तर आम्हालाही कमी समजू नका, आम्हाला शांततेत निवडणूक लढायची आहे, असा इशारा देखील जलील यांनी दिला आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. प्रचार सुरु असताना हा हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे चर्चा आहे. या हल्ल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून अतुल सावे आणि शिरसाटांच्या गुंडानी हल्ला केल्याला त्यांनी आरोप केला आहे.
advertisement
संभाजीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात इम्तियाज जलील यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर इम्तियाज जलील हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. जलील म्हणाले, हा हल्ला भाजप मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्या गुंडांनी केला आहे. हे गुंड भाड्याने पाठवण्यात आले होते. मात्र त्यांच्या या हल्ल्याला आम्ही घाबरत नाही.
advertisement

इम्तियाज जलील यांनी कोणाची नावे घेतली?

माझ्यावर कोणी हल्ला केला हे आम्हाला सगळं माहीत आहे. संभाजीनगरमधील पदयात्रेला मी रीतसर परवानगी घेतली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि दोषींवर कारवाई करा, आमची सगळी तयारी करा, गुंडगिरी करायची असेल तर आम्हाला कमी समजू नका. आम्ही गप्प बसणारे नाही. कलीम कुरेशी याचे नंबर दोनचे धंदे आहे. कलीम कुरेशी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी हे सगळं घडून आणले आहे . मी पैसे घेऊन कोणालाही तिकीट दिले नाही, असेही जलील म्हणाले.
advertisement

इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

आम्ही गप्प बसणारे नाहीत त्यांना राडा करायचा असेल तर आम्ही उत्तरे देऊ. त्यांना असं वाटलं होतं आमची रॅली थांबवू पण रॅली थांबणार नाही. गुंडगिरी तुम्हाला करायची असेल तर आम्हालाही कमी समजू नका. आम्हाला शांततेत निवडणूक लढायची आहे, असा इशारा देखील जलील यांनी दिला आहे.

नेमकं काय झालं? 

advertisement
छत्रपती संभाजीनगर मधील बायजीपुऱ्यात एमआयएम चे कार्यकर्ते आणि एमआयएमचे नाराज कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. एम आय एम कार्यकर्ते आणि नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला असून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगरमधील हल्ल्यनंतर जलील माध्यमांसमोर, थेट हल्लेखोराच्या आकांची नावं घेतली
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement