दादरच्या रानडे रोडवरील डिसिल्व्ह हायस्कूल ग्राउंडच्या शेजारी असलेल्या स्वीट बेबी शॉपमध्ये मकर संक्रांतीसाठी खास लहान मुलांचे आकर्षक कपडे आणि दागिन्यांची मोठी रेंज उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथे केवळ 200 रुपयांपासून लहान मुलांसाठी सुंदर आणि पारंपरिक कपडे मिळत आहेत.
परंपरा जपणारा कुंभारवाडा अडचणीत, मकरसंक्रांतीच्या खणांना अपेक्षित मागणी नाही; नेमकं कारण काय?
advertisement
या दुकानात मुलींसाठी न्यू बोर्नपासून ते 10 वर्षांपर्यंत, तर मुलांसाठी न्यू बोर्नपासून 5 वर्षांपर्यंतचे कपडे उपलब्ध आहेत. मुलींसाठी पैठणी फ्रॉक, खणाचे फ्रॉक, नऊवारी साडी, घागरा-चोळी यांसारख्या पारंपरिक पोशाखांचा समावेश आहे. पैठणी फ्रॉक केवळ 500 रुपयांमध्ये, तर वेलवेटचे परकर-पोळकं 750 रुपयांपासून उपलब्ध आहेत. संक्रांतीसाठी खास धोती पॅटर्नचे कपडेही 750 रुपयांपासून येथे मिळत आहेत.
कपड्यांसोबतच मकर संक्रांतीच्या बोरन्हाणसाठी आवश्यक असलेले तिळगुळांचे दागिने देखील येथे उपलब्ध आहेत. हार, बांगड्या, कानातले अशा विविध प्रकारच्या दागिन्यांची किंमत 200 ते 300 रुपयांपर्यंत आहे. याशिवाय बोरन्हाणसाठी लागणारे डेकोरेशन आयटम्स देखील येथे मिळत असून त्यांची सुरुवात फक्त 50 रुपयांपासून होते.
कमी दरात, एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध असल्यामुळे पालकांमध्ये या दुकानाला मोठी पसंती मिळत आहे. दादरमध्ये राहणाऱ्या तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी स्वीट बेबी शॉप हे मकर संक्रांती खरेदीसाठी एक उत्तम ठिकाण ठरत आहे.





