Mumbai : ग्राहकांनो लक्ष द्या! स्मार्ट मीटर वापरल्यावर वीज बिलावर मिळणार थेट कपात; पण कसं?
Last Updated:
Home Electricity : भांडुप परिमंडलातील 12 लाख 81 हजार ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर वापरून 4 कोटी 13 लाख रुपयांची वीज बचत केली. रियल टाईम वीज माहिती आणि अचूक बिलिंग मिळवण्यासाठी टीओडी मीटर फायदेशीर.
मुंबई : सध्या राज्यातील सर्व ठिकाणी घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटर बसवले जात आहेत. हे मीटर ग्राहकांना रियल टाईममध्ये वीज वापराची माहिती देतात आणि वीज वापरात पारदर्शकता आणतात. टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीजवापराचा अचूक अंदाज मिळतो आणि बिलिंगही अचूक होते.
ग्राहकांना मिळणार बिलावर मोठी बचत
विशेष म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळते. महावितरणच्या भांडुप परिसरात सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या तीन महिन्यांत 12 लाख 81 हजार ग्राहकांनी या विशिष्ट वेळेत वीज वापरून एकूण 4 कोटी 13 लाखांहून अधिक रुपये वाचवले आहेत.
advertisement
टीओडी मीटरमुळे ग्राहक आपला वीज वापर नियोजनपूर्वक करू शकतात. उदाहरणार्थ सकाळी किंवा दुपारी वीज जास्त लागणारे उपकरण वापरण्याऐवजी, वीज कमी लागणाऱ्या वेळेत वापर करणे शक्य होते. यामुळे वीज बिलात बचत होते
भांडुप परिसरात टीओडी मीटर वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहक आता रियल टाईममध्ये वीज वापरावर नियंत्रण ठेवू शकतात आणि बचतीसाठी योग्य निर्णय घेऊ शकतात. भविष्यात राज्यभर या मीटरचा विस्तार होऊन वीज बचतीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 1:14 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : ग्राहकांनो लक्ष द्या! स्मार्ट मीटर वापरल्यावर वीज बिलावर मिळणार थेट कपात; पण कसं?











