'क्रांतिज्योती विद्यालय'ने विकेंडला केलं बजेट वसूल, पहिल्या सोमवारी पुन्हा कोटींची कमाई

Last Updated:
Krantijyoti Vidyalay - Marathi Madhyam Box Office Collection : मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणार 'क्रातिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' या सिनेमानं वीकेंड तर गाजवलाच. पहिल्या समोवारी - मंगळवारी देखील कोटींची कमाई केली आहे.
1/8
नव्या वर्षातही 'धुरंधर' सिनेमाची क्रेझ पाहायला मिळतेय. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कब्जा केलेला असताना दुसरीकडे मराठी सिनेमाही कुठे कमी नाही. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमानं नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. 

advertisement
2/8
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमानं पहिल्याच वीकेंडला दमदार कमाई करत बजेट वसूल केलं. सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे. धुरंधरच्या ट्रेंडमध्ये 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम'ची कमाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

3/8
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' सिनेमानं पहिल्या वीकेंडला 3.91 कोटींची कमाई करत सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर आता सोमवारी आणि मंगळवारी देखील सिनेमानं दमदार कामगिरी केली आहे. 

4/8
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धाव घेताना दिसत आहे. मराठी शाळेच्या आठवणी, शिक्षक-विद्यार्थी नात्यांची ऊब आणि भावनिक कथा यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. 

5/8
वीकेंडनंतरही सिनेमाची घोडदौड कायम असून आठवड्याच्या सुरुवातीला देखील कमाईचा वेग कमी झालेला नाही. पहिल्या सोमवारी सिनेमानं 52 लाखांची कमाई केली आहे.  तर मंगळवारी 52.6 लाख रुपयांची कमाई केली आहे. वीक डेजला सुद्ध प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन मराठी सिनेमा पाहत आहेत हे चित्र कौतुकास्पद आहे. 

6/8
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर आणि BookMyShow वर ट्रेंडिंग ठरत आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमाची रिलीजच्या पाच दिवसांतली कमाई जवळपास पाच कोटींच्या जवळ पोहोचली आहे. 

7/8
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' सिनेमानं रिलीज झाल्यापासून आतापर्यंत एकूण 4.96 कोटींची कमाई केली आहे. येणाऱ्या दिवसांत सिनेमा 5 कोटींहून अधिक कमाई करेल यात काही शंका नाही. 

8/8
या सिनेमात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. द फोक आख्यानच्या त्रीमूर्तींची सिनेमाला संगीत आणि गाणी दिली आहे. हर्ष-विजय यांचं संगीत आणि ईश्वर अंधारेचे मनाली भिडणारी गाणी सिनेमात आहेत.

BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ,, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,, वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement