TRENDING:

धमकी, दहशत अन् वर्षभर अमानुष छळ! 8 वर्षांच्या मुलीसोबत पुण्यात जे घडलं, ते जाणून तुमचाही थरकाप उडेल

Last Updated:

हा नराधम केवळ अत्याचार करून थांबला नाही, तर या प्रकाराबाबत कोणालाही सांगितल्यास "तुला मारून टाकीन", अशी भीती तो त्या चिमुरडीला घालत होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहराच्या उपनगरातील लोणीकंद परिसरातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय नराधमाने आठ वर्षांच्या चिमुरडीवर गेल्या वर्षभरापासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणीकंद पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
चिमुकलीवर अत्याचार (AI Image)
चिमुकलीवर अत्याचार (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

संजय जाधव (वय ५०, रा. खुटाळे वस्ती, वाडेबोल्हाई, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी केवळ आठ वर्षांची असून आरोपी जाधव हा गेल्या एक वर्षापासून तिच्याशी अश्लील कृत्य करत होता. निरागस मुलीला आपल्या वासनेचं शिकार बनवताना त्याने तिला सातत्याने धमकावले होते.

advertisement

हा नराधम केवळ अत्याचार करून थांबला नाही, तर या प्रकाराबाबत कोणालाही सांगितल्यास "तुला जिवे मारून टाकीन", अशी भीती तो त्या चिमुरडीला घालत होता. या धमकीमुळे घाबरलेली मुलगी दीर्घकाळ शांत होती. मात्र, त्याच्या छळाचा अतिरेक झाल्याने आणि सततच्या दहशतीमुळे अखेर तिने आपल्या आईकडे घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीची आपबिती ऐकून हादरलेल्या आईने तत्काळ लोणीकंद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी संजय जाधवला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत एका ज्येष्ठ व्यक्तीकडून चिमुरडीचा असा छळ झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
धमकी, दहशत अन् वर्षभर अमानुष छळ! 8 वर्षांच्या मुलीसोबत पुण्यात जे घडलं, ते जाणून तुमचाही थरकाप उडेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल