Mumbai News: मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी; सीएसएमटी ते नरिमन पॉईंटला जाणाऱ्या बेस्टचा मार्गात झाला मोठा बदल
Last Updated:
Mumbai Latest News : मुंबईत 115 आणि 111 क्रमांकाच्या बेस्ट बसचा प्रवास मंत्रालय आरसा गेटजवळ अर्धवट थांबवला जात असून प्रवाशांना नाराजी आहे. काही प्रवाशांना एसी तिकीट असूनही नॉन एसी बसमध्ये प्रवास करावा लागतो. प्रशासनाने उपाययोजना करावी.
advertisement
1/6

मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची समस्या समोर आली आहे. सीएसएमटी ते एनसीपीए किंवा फ्री प्रेस जर्नल जाणाऱ्या 115 तसेच 111 क्रमांकाच्या बेस्ट बसचा प्रवास मंत्रालय आरसा गेटजवळ अर्धवट थांबवला जात आहे. त्यामुळे नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
advertisement
2/6
सकाळी सीएसएमटी ते नरिमन पॉईंट आणि सायंकाळी नरिमन पॉईंट ते सीएसएमटी दरम्यान या बसमध्ये प्रवाशांची संख्या खूप जास्त असते. 115 आणि 111 क्रमांकाच्या बसमध्ये चर्चगेट, मंत्रालय, विधानभवन आणि एनसीपीएला जाणारे प्रवासी प्रवास करतात.
advertisement
3/6

4/6
13 ऑक्टोबरला सीएसएमटी ते फ्री प्रेस जर्नल जाणाऱ्या 111 क्रमांकाच्या बसचा प्रवास सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आरसा गेटजवळ संपवण्यात आला. या बसमधील प्रवाशांना चर्चगेट ते फ्री प्रेस जर्नल जाणाऱ्या 100 क्रमांकाच्या नॉन एसी बसमध्ये बसवण्यात आले.
advertisement
5/6
परंतु 100 क्रमांकाची बस नॉन एसी असून काही प्रवाशांनी आधी एसी तिकीट खरेदी केले होते. त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित सुविधा न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली गेली.
advertisement
6/6
बेस्टच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना मोठा गैरसोय भोगावी लागली. प्रवाशांनी हा त्रास दूर करण्याची मागणी केली आहे. बस प्रवाशांच्या सुविधेसाठी नियोजन सुधारावे तसेच प्रवाशांना योग्य बस आणि सुविधा मिळाव्यात याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai News: मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी; सीएसएमटी ते नरिमन पॉईंटला जाणाऱ्या बेस्टचा मार्गात झाला मोठा बदल