DDLJ पाहून लोक असं काय सांगतात, ऐकून इमोशनल होतो शाहरुख, 30 वर्षांनी पहिल्यांदा बोलला SRK
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shahrukh Khan on 30th Years of DDLJ : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाची क्रेझ आज 30 वर्षांनीही कमी झालेली नाही. यानिमित्तानं शाहरुख खानने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
1/9

बॉलिवूडच्या कल्ट क्लासिक सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे. आजही मुंबईच्या मराठा मंदिरला या सिनेमाचे शो सुरू आहेत.
advertisement
2/9
DDLJ रिलीज होऊन 30 वर्ष झाली आहेत. मात्र आजही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. स्वत: शाहरुख खानने या रिअँक्शन दिली आहे. आजही DDLJ पाहिल्यानंतर लोक शाहरुखला एक खास गोष्ट येऊन सांगतात.
advertisement
3/9
शाहरुख खान आणि काजोल यांच्या या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर लव्ह स्टोरीने गेल्या तीन दशकांपासून भारतासह जगभरातील प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
4/9
राज आणि सिमरन ही जोडी आजही प्रेमाचं प्रतीक बनली आहे. सिनेमाच्या तीस वर्षपूर्तीनिमित्तानं शाहरुखने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
5/9
शाहरुख खान म्हणाला, "विश्वास बसत नाही की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेला 30 वर्ष झाली आहेत. असं वाटतं जणू कालच रिलीज झाला होता… कारण ‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं’!"
advertisement
6/9
"खरं सांगायचं तर अजूनही हे अविश्वसनीय वाटतं. राजच्या भूमिकेसाठी जगभरातून मिळालेलं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही."
advertisement
7/9
"जेव्हा लोक थिएटरमधून सिनेमा पाहून येतात आणि सांगतात की हा सिनेमा पाहिल्यानंतर आम्ही प्रेमात पडलो किंवा लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा क्षण आयुष्यभर माझ्या लक्षात राहिल."
advertisement
8/9
शाहरुख खान पुढे म्हणाला, "या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही अनेक जोडपी मला भेटतात आणि सांगतात की, डीडीएलजे पाहिल्यावर त्यांनी लग्न केलं किंवा पहिल्यांदा प्रेमात पडले."
advertisement
9/9
"मला वाटतं या सिनेमाने भारतीय आणि दक्षिण आशियाई संस्कृतीच्या पॉप कल्चरवर एक वेगळी छाप सोडली आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
DDLJ पाहून लोक असं काय सांगतात, ऐकून इमोशनल होतो शाहरुख, 30 वर्षांनी पहिल्यांदा बोलला SRK