आईला मुखाग्नी देऊन जेमतेम महिना होत नाही तोच लेकही गेला, US- इराण युद्धात कांदिवलीच्या तरुणाचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धात ओमानच्या किनारपट्टीवर इराणच्या ड्रोन हल्ल्यात २५ वर्षीय दीक्षित सोळंकीचा मृत्यू. दीक्षित मूळचा दीवमधील भावसारवाडा येथील रहिवासी होता.
advertisement
1/6

ज्या हातांनी महिनाभरापूर्वीच आईला मुखाग्नी दिला, त्याच हातांना आता नियतीने आपल्यापासून कायमचं दूर केलं. इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या आगीत एका सामान्य भारतीय कुटुंबाचं स्वप्न खाक झालं आहे. ओमानच्या किनारपट्टीवर इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात २५ वर्षीय दीक्षित सोळंकी या खलाशाचा मृत्यू झाला.
advertisement
2/6
दीक्षित हा मूळचा दीवमधील भावसारवाडा इथला रहिवासी होता. त्याचे वडील अमृतलाल सोळंकी यांचा मासेमारीचा व्यवसाय होता. घरातील सर्वात लहान आणि लाडका मुलगा असलेल्या दीक्षितने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मर्चंट नेव्हीमध्ये करियर निवडलं.
advertisement
3/6
महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झालं होतं. आईच्या अंत्यसंस्कारासाठी तो मुंबईत आला होता. तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की ही त्याची त्याच्या लाडक्या शहराची आणि कुटुंबाची ही शेवटची भेट ठरेल.
advertisement
4/6
दीक्षित 'MKD व्योम' या ऑइल टँकरवर इतर २५ सहकाऱ्यांसह कामावर होता. मस्कतकडे जात असताना स्फोटकांनी भरलेल्या एका ड्रोन बोट त्यांच्या जहाजावर येऊन धडकली. ज्या इंजिन रूममध्ये दीक्षित काम करत होता त्याच वेळी, तिथेच भीषण स्फोट झाला आणि आग लागली.
advertisement
5/6
इतर १६ भारतीय सहकाऱ्यांचा जीव वाचला, पण दीक्षितचा या स्फोटात मृत्यू झाला. ज्या घरात आईच्या आठवणी होत्या, त्या घरला शेवटचा निरोप देऊन तो कामावर गेला. मात्र या युद्धादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
6/6
ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोलंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील इतर २५ क्रू मेंबर्सची (ज्यात १६ भारतीय होते) सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
आईला मुखाग्नी देऊन जेमतेम महिना होत नाही तोच लेकही गेला, US- इराण युद्धात कांदिवलीच्या तरुणाचा मृत्यू