Special Rashifal: धूलिवंदननंतर वसंतोत्सव! 25 मार्चपर्यंत या राशींवर अनपेक्षित पैसा बरसणार, भाद्रपदार्क लकी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशीपरिवर्तन होत असते. धन-दौलत, प्रेम आणि सौंदर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह वेळोवेळी आपली रास बदलत असतो. त्याचा परिणाम सगळ्या 12 राशींवर होतो. सध्या शुक्र शनीच्या कुंभ राशीत होता, पण रविवार 1 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 8 वाजून 31 मिनिटांनी त्याने गुरूच्या मीन राशीत प्रवेश केला आहे.
advertisement
1/5

मीन रास ही शुक्राची सगळ्यात लाडकी (उच्च) रास मानली जाते, म्हणून हे बदल खूप महत्त्वाचे आहेत. ज्योतिषानुसार, शुक्र मीन राशीत गेल्यामुळे मालव्य राजयोग आणि केन्द्र-त्रिकोण राजयोग तयार होत आहेत.
advertisement
2/5
25 मार्चपर्यंत शुक्र याच राशीत राहणार आहे, त्यामुळे काही राशींना याचे भारी फायदे मिळणार आहेत. कोणत्या राशींना याचा फायदा होईल, त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
3/5
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा बदल पैशाच्या बाबतीत मोठा दिलासा देणारा ठरेल. जर तुमचे काही पैसे खूप दिवसांपासून अडकले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल आणि फालतू खर्चावर लगाम बसेल. करिअरमध्ये नवी जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि नात्यातली समज सुधारेल. समाजात वावरताना मान-सन्मान वाढेल.
advertisement
4/5
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ घर-दार आणि मालमत्तेच्या कामात शुभ संकेत देतोय. नवीन गाडी किंवा घर घेण्याचा विचार असेल तर तो आता पूर्ण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचं स्थान पक्कं होईल आणि मोठ्या साहेबांचं सहकार्य मिळेल. संसारात सुख-शांती राहील आणि जोडीदाराशी पटवून घेणं सोपं जाईल. पैशांची स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही चांगली बचत करू शकाल.
advertisement
5/5
वृषभ - वृषभ राशीचा मालक स्वतः शुक्रच आहे, त्यामुळे हे बदल तुमच्यासाठी लय खास आहेत. कमवायचे नवीन मार्ग सापडतील आणि धंद्यात नफा वाढताना दिसेल. रखडलेली कामं आता पटापट पूर्ण होतील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळतील. लव्ह लाईफमध्ये खुशाल वातावरण राहील आणि नवरा-बायकोचं नातं घट्ट होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण लय वाढेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Special Rashifal: धूलिवंदननंतर वसंतोत्सव! 25 मार्चपर्यंत या राशींवर अनपेक्षित पैसा बरसणार, भाद्रपदार्क लकी