कोकणात थंडी तर मुंबईत उकाडा, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Mumbai Weather Update: कोकणातील हवामानात सातत्याने बदल होत असून थंडीचा कडाका वाढला आहे. आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

उत्तर भारतात दाट धुकं आणि थंडीची लाट आली आहे. परिणामी राज्यात कोरड्या वाऱ्याच्या प्रवाहांमध्ये वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढणार आहे.
advertisement
2/5
काल संपूर्ण दिवसभर मुंबईच हवामान दमट होतं. परंतु असं असलं तरी सुद्धा मुंबईतला गारवा मात्र दिवसभर कायम होता. आज दिवसभर उष्णता जाणवेल. रात्री मात्र वातावरण थंड राहील आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात थंडीही जाणवेल.
advertisement
3/5
ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरात सुद्धा दिवसभर गरमीचे वातावरण पाहायला मिळेल. येत्या काही दिवसात थंडी वाढण्याची शकत्या आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 47 टक्के असेल.
advertisement
5/5
कोकणात सुद्धा सध्या दमट आणि ढगाळ वातावरण आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीची लाट वाढत आहे. काल 20 अंश सेल्सिअस असणारे तापमान आज आणखी खाली उतरण्याचा अंदाज आहे.