कोकणात थंडीचा कडाका वाढला, मुंबईही गारठली, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Mumbai Weather Update: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट टिकून आहे. कोकणात हवामानाची स्थिती कशी असेल जाणून घ्या.
advertisement
1/5

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट टिकून आहे. मात्र, गुरुवारनंतर पारा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 10 दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
2/5
मुंबई सुद्धा थंडीची लाट असल्यामुळे पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना या थंडीचा सामना करावा लागत आहे. आज संपूर्ण दिवस मुंबईमध्ये सकाळी धुक्याची तीव्रता अधिक राहील आणि दिवसभर हवामान कोरडे राहील.
advertisement
3/5
मुंबई आणि त्याचसोबत ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या उपनगरांमध्ये सध्या थंडीची लाट निर्माण झाली असून येणाऱ्या काही दिवसात थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. डिसेंबरच्या शेवटच्या पाच दिवसांमध्ये या ठिकाणी वातावरणात काही बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 43 टक्के राहील.
advertisement
5/5
कोकणात सुद्धा गेले अनेक दिवस कोकणवासीय थंडीची प्रतीक्षा करत होते. आता कोकणातही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये गारठा वाढायला सुरुवात झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
कोकणात थंडीचा कडाका वाढला, मुंबईही गारठली, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?