TRENDING:

Mumbai Weather Update: कोकणात थंडीची लाट, मुंबईतही हुडहुडी, वाचा हवामानाचा अंदाज

Last Updated:
Mumbai Weather Update: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईत गारठा वाढला असून कोकणातही थंडीचा जोर दिसत आहे.
advertisement
1/5
कोकणात थंडीची लाट, मुंबईतही हुडहुडी, वाचा हवामानाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून राज्यात असलेली थंडीची लाट गायब झाली आहे. बऱ्याच ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी काहीशी दमट हवा जाणवत असून त्यानंतर आता राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
2/5
काल संपूर्ण दिवसभर मुंबईच हवामान दमट होतं. परंतु असं असलं तरी सुद्धा मुंबईतला गारवा मात्र दिवसभर कायम होता. आज सुद्धा दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात थंडीही जाणवेल.
advertisement
3/5
मुंबई आणि त्यासोबतच ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरात सुद्धा काल दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्‍यता असली तरी सुद्धा मुंबई आणि उपनगरात सध्या पावसाची चिन्ह नाहीत.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 47 टक्के असेल.
advertisement
5/5
कोकणात सुद्धा सध्या दमट आणि ढगाळ वातावरण आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीची लाट वाढत आहे. काल 20 अंश सेल्सिअस असणारे तापमान आज आणखी खाली उतरण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Update: कोकणात थंडीची लाट, मुंबईतही हुडहुडी, वाचा हवामानाचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल