मुंबईतील थंडीत वाढ, कोकणातही तापमानात घट होणार, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Mumbai Weather Update: कोकणातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईत दोन दिवसांपासून हवेत गारवा जाणवत आहे.
advertisement
2/5
मुंबईतील काही भागात सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. तसेच सकाळी थंडीही वाढत आहे. किमान तापमानात अनेक भागात घट झाली असून दुपारी जाणवत असलेला उकाडाही काही प्रमाणात कमी झाला आहे.
advertisement
3/5
मुंबईचा ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या उपनगरांमध्ये सुद्धा हळूहळू थंडी वाढत आहे. येत्या काही दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 19 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 34 टक्के असेल.
advertisement
5/5
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी 3 ते 4 अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या हवामान बदलामुळे शेतकरी मात्र मोठ्या विवंचनेत सापडले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईतील थंडीत वाढ, कोकणातही तापमानात घट होणार, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?