TRENDING:

कोकणात थंडीचा कडाका वाढणार, मुंबईतही पारा घसरणार, हवामान विभागाने दिला अलर्ट

Last Updated:
Mumbai Weather Update: या आठवड्यात मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान करण्यात आले आहे.
advertisement
1/5
कोकणात थंडीचा कडाका वाढणार, मुंबईतही पारा घसरणार, हवामान विभागाने दिला अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठया प्रमाणात बदल झाले आहेत. सध्या राज्यातील तापमानाचा पारा घसरल्याचे चित्र आहे. राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यातील किमान तापमान घसरले आहे. पहाटेच्या किमान तापमानात घट झाली असून कडाक्याची थंडी जाणवत आहे.
advertisement
2/5
जानेवारी महिन्याला सुरुवात होऊन देखील, हवी तेवढी थंडी मुंबईत जाणवत नसल्याची स्थिती आहे. मात्र, या आठवड्यात मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान करण्यात आले आहे.
advertisement
3/5
मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या उपनगरांत सुध्दा पुढील काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता आहे. सध्या या सर्व ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे पहाटे कामावर जाणारा मुंबईकर मात्र गारठला आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 17 अंश सेल्सिअस आणि 33 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 49 टक्के असेल.
advertisement
5/5
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे. डिसेंबर महिन्या पासूनच इथे मोठया प्रमाणात हवामान बदल झाले आहेत. यामुळे आंबा आणि काजूचे बागायतदार मात्र चिंतेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
कोकणात थंडीचा कडाका वाढणार, मुंबईतही पारा घसरणार, हवामान विभागाने दिला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल