TRENDING:

Mumbai Weather : मुंबईवर अस्मानी संकट कायम, कोकणातही जोरदार कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा कायम आहे. विशेष म्हणजे, कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरातही पावसाच्या सरी सातत्याने पडत आहेत.
advertisement
1/5
मुंबईवर अस्मानी संकट कायम, कोकणातही जोरदार कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात सध्या पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. दसरा झाला, दिवाळी झाली, अगदी तुळशी विवाहही पार पडला, तरीही पावसाने अद्याप माघार घेतलेली नाही. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा कायम आहे. विशेष म्हणजे, कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरातही पावसाच्या सरी सातत्याने पडत आहेत. हवामान विभागाने आज, म्हणजेच 3 नोव्हेंबर 2025 रोजी, पुन्हा काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी सलग दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अनेक भागांत दिवसभर वातावरण ढगाळ राहिले होते. आजही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागांत रिमझिम, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तापमान सुमारे 31 अंश सेल्शिअस कमाल आणि 25 अंश सेल्शिअस किमान इतकं राहील, तर आर्द्रता पातळी वाढलेली राहील.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाला होता. काल दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम ते जोरदार सरी पडल्या. आजही अशीच स्थिती राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. काही भागांत सकाळच्या सुमारास हलक्या सरी तर सायंकाळी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो.
advertisement
4/5
पालघरमध्येही पावसाचं वातावरण कायम आहे. आज जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस (Moderate Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ग्रामीण भागांमध्ये ढगाळ वातावरणासोबत वाऱ्याचा वेगही वाढलेला दिसेल. तापमानात मात्र किंचित घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवर सध्या सर्वाधिक पावसाचं प्रमाण दिसत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार पाऊस होणार आहे. समुद्र किनाऱ्याजवळील भागात वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास इतका असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओलसर स्थिती आणि वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather : मुंबईवर अस्मानी संकट कायम, कोकणातही जोरदार कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल