IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडिया मालामाल, साऊथ आफ्रिकेवर पडणार पैशांचा पाऊस,किती बक्षीस रक्कम मिळणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामन्यावर भारताच्या महिला संघाने नाव कोरले आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेचा महिला संघ उप विजेता ठरला आहे.
advertisement
1/7

आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामन्यावर भारताच्या महिला संघाने नाव कोरले आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेचा महिला संघ उप विजेता ठरला आहे.या विजेत्या आणि उपविजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार आहे. हे जाणून घेऊयात.
advertisement
2/7
खरं तर वर्ल्ड कपची फायनल जिंकणाऱ्या भारतीय संघाला तब्बल 4.48 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 40 कोटी) मिळणार आहेत. ही रक्कम ऑस्ट्रेलियाच्या 2022 च्या बक्षीस रकमेपेक्षा 239 टक्के जास्त आहे.
advertisement
3/7
वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या ठरलेल्या साऊथ आफ्रिकेला 2.24 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 20 कोटी) मिळतील. ही रक्कम इंग्लंडच्या 2022 च्या बक्षीस रकमेपेक्षा 273 टक्के जास्त आहे.
advertisement
4/7
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांना 1.12 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 9.3 कोटी) इतकी समान रक्कम मिळाली.
advertisement
5/7
गुणतालिकेत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना (श्रीलंका आणि न्यूझीलंड) 700,000 डॉलर्स (अंदाजे 5.8कोटी) इतकी समान रक्कम मिळाली.
advertisement
6/7
सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या संघांना (बांगलादेश आणि पाकिस्तान) 280,000 डॉलर्स (अंदाजे 2.3 कोटी) मिळाले.
advertisement
7/7
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघाला 250,000 डॉलर्स (अंदाजे 2 कोटी) ची स्वतंत्र हमी दिली जात आहे. शिवाय, गट टप्प्यात जिंकणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी संघांना 34,314 डॉलर्स (अंदाजे 2.8 दशलक्ष) मिळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडिया मालामाल, साऊथ आफ्रिकेवर पडणार पैशांचा पाऊस,किती बक्षीस रक्कम मिळणार?