IND vs SA Final : रोहित विराटवर कोट्यवधीची उधळण, मग स्मृती हरमनला इतके कमी पैसे का मिळतात?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियासाठी मैदानात घाम गाळणाऱ्या महिला खेळाडूंना पुरूषांच्या तुलनेत नेमके किती पैसे मिळतात? हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.पण आज दोघांना किती पैसे मिळतात हे जाणून घेऊयात.
advertisement
1/8

टीम इंडियासाठी मैदानात घाम गाळणाऱ्या महिला खेळाडूंना पुरूषांच्या तुलनेत नेमके किती पैसे मिळतात? हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.पण आज दोघांना किती पैसे मिळतात हे जाणून घेऊयात.
advertisement
2/8
भारतीय महिला संघाच्या खेळाडूंना कसोटीसाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.
advertisement
3/8
आता महिला खेळाडू्प्रमाणेच भारताच्या पुरूष खेळाडूंना देखील इतकीच रक्कम मिळते. त्यामुळे भारतीय महिला संघाला पुरुष संघाइतकेच मॅच फी मिळते. या निर्णयाची अंमलबजावणी 2022 मध्ये तत्कालीन बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली होती.
advertisement
4/8
आता ही झाली मॅच फी ची गोष्ट.पण केंद्रीय करार (Central Contract) यादीत सर्वात मोठा फरक आहे.कारण मानधना आणि हरमनप्रीतचे वार्षिक उत्पन्न विराट आणि रोहितच्या जवळपासही नाही.
advertisement
5/8
2024-2025 या कालावधीसाठी, विराट, रोहित, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना A+ श्रेणीत ठेवण्यात आले होते.तर महिला संघासाठी A+ श्रेणीच नाही. महिला संघासाठी सर्वात मोठी श्रेणी म्हणजे A श्रेणी, ज्यामध्ये फक्त तीन क्रिकेटपटू आहेत, स्मृती, हरमनप्रीत आणि दीप्ती शर्मा.
advertisement
6/8
बीसीसीआयच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, ए+ श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळतात, तर ए, बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे 5 कोटी रुपये, 3 कोटी रुपये आणि 1 कोटी रुपये मिळतात.
advertisement
7/8
महिला संघाच्या बाबतीत, ए श्रेणीतील खेळाडूंना 50 लाख रुपये मिळतात, तर बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना 30 लाख रुपये आणि 10 लाख रुपये मिळतात.
advertisement
8/8
त्यामुळे सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार रोहित विराटच्या तुलनेत हरमनप्रीत आणि स्मृती मानधानाला खूपच कमी रक्कम मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : रोहित विराटवर कोट्यवधीची उधळण, मग स्मृती हरमनला इतके कमी पैसे का मिळतात?