Mumbai Rain: पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणातील या जिल्ह्यांनाही अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारनंतर काही भागांत विजांसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
1/5

गेल्या दोन दिवसांपासून कोकण, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत पावसाने चांगलाच जोर धरला असून, आज 30 जून रोजीही हवामान खात्याने काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून, शहरी व ग्रामीण जीवनावर परिणाम झाला आहे.
advertisement
2/5
28 आणि 29 जून रोजी मुंबई शहरामध्ये सलग पावसाचा जोर दिसून आला. चेंबूर, सायन, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, मालाड या भागांमध्ये काल जोरदार सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी BEST बससेवा उशिराने धावत होती आणि स्थानकांवर गर्दी झाली होती. आज 30 जून रोजीही हवामान ढगाळ असून सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरींची सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारनंतर काही भागांत विजांसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईकरांना ३० जून रोजी हवामान खात्याने पुन्हा एकदा ढगाळ वातावरण व मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. संध्याकाळनंतर विजांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
4/5
पालघरमध्ये परवा आणि काल दोन्ही दिवशी पावसाचा जोर राहिल्याने डहाणू, तलासरी, वसई आणि जव्हार भागांतील ग्रामीण भागात पाणी साचले आहे. आज 30 जून रोजी हवामान ढगाळ राहून हलक्या सरींचा अंदाज असून, संध्याकाळपर्यंत काही भागांत मध्यम पावसाची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
5/5
30 जून रोजी हवामान विभागाने रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणातील या जिल्ह्यांनाही अलर्ट