TRENDING:

Navi Mumbai Traffic: नवी मुंबईत वाहतुकीत मोठा बदल, विमानतळामुळे रस्त्यांची कामे सुरु; कोणता मार्ग बंद, कोणता सुरु?

Last Updated:
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यापूर्वी तरघर पुलाला जोडणाऱ्या लूप रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे काही दिवस रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
advertisement
1/7
नवी मुंबईत वाहतुकीत मोठा बदल, विमानतळामुळे रस्त्यांची कामे सुरु; कोणता मार्ग बंद
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस सुरु असून या संबंधित सर्व तय्यारीही अंतिम टप्प्यात आली आहे.25 डिसेंबरपासून या विमानतळावरून प्रवासी उड्डाणे सुरू होणार असल्याने परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
advertisement
2/7
नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या मार्गांची डागडुजी करण्यात येत आहे, कारण प्रवाशांची आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
advertisement
3/7
तरघर परिसरातील पुलाला जोडणाऱ्या लूप ए आणि लूप बी या मार्गांचे काम सध्या सुरू आहे. हे दोन्ही लूप एका ठिकाणी एकत्र येतात आणि या भागातील रस्ता खराब अवस्थेत असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथे सात दिवसांचे काम हाती घेण्यात आले आहे.
advertisement
4/7
ही दुरुस्ती २५ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून १ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या सात दिवसांच्या काळात संबंधित मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. सीबीडी बेलापूर वाहतूक शाखेने यासंदर्भातील अधिकृत सूचना जाहीर केल्या आहेत.
advertisement
5/7
विमानतळ परिसरातील सर्व्हिस रोड, मुख्य रस्ते आणि जोडरस्त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी खड्डे, तडे किंवा पाणी साचण्याची समस्या आहे, ती ठिकाणे पहिल्यांदा दुरुस्त करुन घेतले जात आहेत.
advertisement
6/7
काम वेळेत पूर्ण होण्यासाठी मनपा आणि संबंधित कंत्राटदारांकडून सतत देखरेख ठेवली जात आहे.विमानतळ सुरू होताच या मार्गांवर वाहतूक वाढणार असल्याने प्रशासनाने आधीच नियोजन करुन ठेवले आहे.
advertisement
7/7
नागरिकांनी काही दिवस वाहतुकीतील बदल समजून सहकार्य करावे असे सांगण्यात आलेले आहे शिवाय काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळाकडे जाणारा मार्ग अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Navi Mumbai Traffic: नवी मुंबईत वाहतुकीत मोठा बदल, विमानतळामुळे रस्त्यांची कामे सुरु; कोणता मार्ग बंद, कोणता सुरु?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल