TRENDING:

Mukta Barve : मुक्ता बर्वेच्या स्वप्नात येते ही गोष्ट, स्वत:च सांगितली ड्रीम स्टोरी

Last Updated:
Mukta Barve on Dreams : अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या स्वप्नात लहानपणापासून ते आजपर्यंत एक गोष्ट स्वप्नात येते. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी मुक्ता बर्वेला हे स्वप्न पडतंच.
advertisement
1/7
मुक्ता बर्वेच्या स्वप्नात येते ही गोष्ट, स्वत:च सांगितली ड्रीम स्टोरी
मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या 'असंभव' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 21 नोव्हेंबर 2025 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमातील सीमेपलीकडचा सस्पेन्स आणि क्षणक्षणाला मिळणारे धक्के प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
advertisement
2/7
बेधडक, बिनदास्त, अभ्यासू अभिनेत्री अशी मुक्ता बर्वेची ओळख आहे. आजवर आपल्या दमदार अभिनयाने तिने हजारो चाहत्यांना वेड लावलं आहे. नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.
advertisement
3/7
आपल्या दर्जेदार अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या मुक्ता बर्वेला मात्र भलतंच स्वप्न पडतं. नुकतंच एका मुलाखतीत मुक्ता बर्वेने आपल्या स्वप्नाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
advertisement
4/7
मुक्ता बर्वेला प्रश्न विचारण्यात आला की, तुला कोणती, कशापद्धतीची स्वप्न पडतात. याचं उत्तर देत मुक्ता म्हणाली,"मला वैयक्तिकरित्या एखाद्या गोष्टीचं प्रेशर असेल तर मला स्वप्न पडतं. शाळा सोडून आता अनेक वर्ष झाली असतील तरी मला अजूनही असं स्वप्न पडतं".
advertisement
5/7
मुक्ता बर्वे म्हणाली,"मला परीक्षा, गुणाकार, भागाकार हे चिन्ह 3D मध्ये अंगावर पडण्याची स्वप्न पडतात. मला गणिताची खूप आवड नव्हती. पण ती चिन्ह मात्र स्वप्नात अंगावर पडायची".
advertisement
6/7
मुक्ता पुढे म्हणाली,"आता कितीही मोठं झालं तरी ते स्वप्न असूनही पडतं. अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशीसुद्धा मला कधी-कधी असं स्वप्न पडतं की गुणाकार-भागाकाराची चिन्ह अंगावर पडतायत".
advertisement
7/7
मुक्ता बर्वेचा आगामी 'मुंबई पुणे मुंबई 4' या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. 15 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा रोमँटिक प्रवास नव्या गोष्टीच्या माध्यमातून काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वेच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mukta Barve : मुक्ता बर्वेच्या स्वप्नात येते ही गोष्ट, स्वत:च सांगितली ड्रीम स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल