TRENDING:

'ठाकरे ब्रँड' चे टीशर्ट घालून पत्रकार परिषद गाजवली अन् मनसेसैनिकाची आता शिंदेंची शिवसेना गाठली

Last Updated:
'मुंबई महापालिकेत फक्त ठाकरे ब्रँड' आवाज मराठीचा... अशा आशयाचे टी शर्ट घालून ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेत मनसेचे पदाधिकारी परेश तेलंग सामील झाले होते.
advertisement
1/6
'ठाकरे ब्रँड' चे टीशर्ट घालून मिरवलं अन् मनसेसैनिकाची आता सेनेचं दार गाठलं
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांच्या जोरबैठका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मराठी माणसाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे दोन्ही गटाने प्रचंड जल्लोष केला. पण, जल्लोष सामील असलेले २ पदाधिकारी ब्रँड ठाकरे म्हणत होते, तेच आता शिवसेनेत दाखल झाले आहे.
advertisement
2/6
'मुंबई महापालिकेत फक्त ठाकरे ब्रँड' आवाज मराठीचा... अशा आशयाचे टी शर्ट घालून ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेत मनसेचे पदाधिकारी परेश तेलंग सामील झाले होते. परेश तेलंग यांचा हा हटके अवतार आकर्षक बनला होता.
advertisement
3/6
परेश तेलंग हे महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष होते. मुंबईतील प्रभाग क्रमांक-२१७ इच्छुक उमेदवार होते. पण, ठाकरे बंधूंची अजून चर्चाच सुरू असल्यामुळे तिकीट मिळणार की नाही, अशी शक्यता कमी होती.
advertisement
4/6
त्यामुळे परेश तेलंग यांनी आवाज मराठीचा, ठाकरे ब्रँड असे टी शर्ट घालून सगळ्याचं लक्ष वेधलं आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
advertisement
5/6
परेश तेलंग यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शनिवारी शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला.
advertisement
6/6
ठाकरे बंधूंच्या जागा वाटपात कट्टर कार्यकर्त्यांच्या हिरमोड होत असल्यानं शिवसेनेचं धनुष्यबाण उचलण्याकडे मनसे पदाधिकाऱ्यांचा कल असल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
'ठाकरे ब्रँड' चे टीशर्ट घालून पत्रकार परिषद गाजवली अन् मनसेसैनिकाची आता शिंदेंची शिवसेना गाठली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल