अवकाळीनंतर कोकणच्या हवामानात मोठे बदल, गारठा वाढला, मुंबईत काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
राज्यात अवकाळी संकटानंतर गारठा वाढला आहे. कोकणात देखील पारा घसरत आहे.
advertisement
1/5

राज्यात थंडीचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील आठवडाभर थंडी टिकून राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पुढील आठवडाभर राज्यात थंडी अशीच टिकून राहणार आहे.
advertisement
2/5
उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा 12 अंशाखाली घसरला आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/5
सध्या मुंबईत कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने चढ उतार सुरू आहे. त्यामुळे कधी पहाटे गारवा असतो तर दिवसा उकाडा जाणवतो. पहाटे अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 25 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवेची आर्द्रता पातळी 44 टक्के असेल.आजच्या अंदाजानुसार आकाश निरभ्र राहील.
advertisement
5/5
मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. कमाल तापमानात घसरण होत असली तरी किमान तापमानाचा पारा अजूनही चढाच आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानंतर हळूहळू तापमानात घट होताना दिसत आहे. संपूर्ण कोकणात पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
अवकाळीनंतर कोकणच्या हवामानात मोठे बदल, गारठा वाढला, मुंबईत काय स्थिती?