TRENDING:

कोकणकरांना गुलाबी थंडीचा अनुभव, मुंबईतही गारठा वाढला, पाहा ताजं हवामान अपडेट

Last Updated:
राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात काही जिल्ह्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1/5
कोकणकरांना गुलाबी थंडीचा अनुभव, मुंबईतही गारठा वाढला, पाहा ताजं हवामान अपडेट
राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळं थंडी वाढली आहे. राज्याच्या किमान तापमानात 1 ते 2 अंशाची वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात काही जिल्ह्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहत होते. पण यंदा उशिराने थंडी सुरू झाली. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी थंडी सुरू झाली आहे.
advertisement
3/5
मुंबई आणि उपनगरात आज सकाळी देखील थंडीची लाट दिसून आली. हवेमध्ये गारवा जाणवत होता.आज पहाटेच्या वेळी लोकलनं प्रवास करणाऱ्या चाकरमानी मात्र थंडीमुळं गारठल्याचं पाहायला मिळाले. पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यातील वातावरण थंड राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 25 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर हवेची आर्द्रता पातळी 46 टक्के असेल.तर आजच्या अंदाजानुसार आकाश निरभ्र राहील.
advertisement
5/5
कोकणात सुद्धा तापमानाचा पारा घसल्याने हुडहुडी वाढली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सकाळी आणि रात्रीच्या तापमानाच मोठी घट होत थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे कोकणकर रहिवासी सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
कोकणकरांना गुलाबी थंडीचा अनुभव, मुंबईतही गारठा वाढला, पाहा ताजं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल