Mumbai Weather Update : मुंबईत गारठा वाढणार, कोकणात पावसाची शक्यता, IMD नं दिला अलर्ट
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
संपूर्ण राज्यात थंडी पुन्हा वाढली आहे. मुंबईतही तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/5

फेंगल चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्यात राज्याच्या तापमानात वाढ झाली होती. मात्र, आता, तापमानाचा पार घसरायला सुरुवात होत गुलाबी थंडीची चाहूल पुन्हा लागली आहे. राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडून गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
2/5
संपूर्ण राज्यात थंडी पुन्हा वाढली आहे. मुंबईतही तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबईच्या तापमानात देखील घट होत या ठिकाणचा पारा 16 अंशांवर आला होता. परंतु अचानक आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे तापमानात वाढ होत थंडी गायब झाली होती.आता मात्र पुन्हा एकदा मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 20 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअस आहे. मुंबई आणि ठाणे, पालघर या उपनगरांत पुढील काही दिवसांत थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा यामुळे कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस सुद्धा बरसत आहे. त्यामूळे कोकणातली वातावरणात पुन्हा कधी बदल होतील याकडे लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Update : मुंबईत गारठा वाढणार, कोकणात पावसाची शक्यता, IMD नं दिला अलर्ट