थंडीमुळे मुंबईकरांना हुडहुडी, कोकणात पारा आणखी घसरणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
राज्यात आता मोठया प्रमाणात थंडी वाढायला लागली आहे. मुंबईतील तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा हुडहूडी भरली आहे.
advertisement
1/5

राज्यात आता मोठया प्रमाणात थंडी वाढायला लागली आहे. उत्तर भारतात मार्गस्थ होत असलेले पश्चिमी वारे आणि समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढली आहे.
advertisement
2/5
मुंबईतील तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा हुडहूडी भरली आहे. येत्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरांत थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
advertisement
3/5
डिसेंबरमध्ये वातावरणातील दमटपणामुळे मुंबईकरांना घाम फुटला होता. 10 डिसेंबरनंतर मुंबई शहर, उपनगर आणि परिसरात कमाल आणि किमान दोन्ही तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर आता ही घट पाहायला मिळत आहे.
advertisement
4/5
आज मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 30 टक्के राहील.
advertisement
5/5
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तापमान पुन्हा घसरू लागल्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील चार दिवसात किमान पारा आणखी खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
थंडीमुळे मुंबईकरांना हुडहुडी, कोकणात पारा आणखी घसरणार, हवामान विभागाचा अलर्ट