TRENDING:

कोकणात तो पुन्हा येणार, मुंबईचा पारा चढला, जाणून घ्या हवामान अंदाज

Last Updated:
Weather Forecast: सायक्लोन सर्क्युलेशनमुळे राज्यातील वातावरणात मोठे बदल झाले आहेत. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. मुंबईतील हवामान स्थिती जाणून घेऊ.
advertisement
1/5
कोकणात तो पुन्हा येणार, मुंबईचा पारा चढला, जाणून घ्या हवामान अंदाज
राज्यात सायक्लोन सर्क्युलेशनमुले वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पाऊस पडत आहे. तर इतरत्र तापमानात वाढ झालीये. पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
राजधानी मुंबईत तापमानचा पारा चढला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पुढील काही दिवस सायक्लोन सर्क्युलेशनमुळे वातावरणात हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहील.
advertisement
3/5
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धूके पाहायला मिळेल. शहरातील किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस एवढं राहील. हवेतील आद्रतेचं प्रमाण 57 टक्के असणार आहे.
advertisement
4/5
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आज 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने गैरसोय होऊ शकते.
advertisement
5/5
दरम्यान, कोकणात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आंबा आणि काजू बागांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
कोकणात तो पुन्हा येणार, मुंबईचा पारा चढला, जाणून घ्या हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल