थंडीच्या दिवसांत घामाच्या धारा, मुंबईकर हैराण, आज कसं असणार हवामान?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
Weather Forecast: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज मुंबई आणि कोकणातील हवामान स्थिती कशी असेल? जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाऊस, थंडी आणि उन्ह तिन्ही ऋतू एकत्रच दिसत आहेत. मुंबईत मात्र तापमानात पुन्हा वाढ झाली असून थंडीची प्रतीक्षा कायम आहे.
advertisement
2/5
मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळी धुके आणि काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर आकाश निरभ्र असणार आहे. त्यामुळे दुपारी मुंबईकरांना प्रचंड उकाडा जाणवणार आहे.
advertisement
3/5
17 नोव्हेंबरला मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. गेल्या काही दिवसांत किमान तापमानात पुन्हा वाढ झाली असून पुढील काही दिवस तापमानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
दिवाळीनंतर मुंबईत हवेत प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यातच तीव्र उकाड्याने नागरिका हैराण झाले आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
advertisement
5/5
गेले 3 दिवस दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा हवामानात बदल जाणवत आहेत. आज कोकणात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहील. तर हवामान कोरडे असणार आहे.