सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पुन्हा पाऊस, पुढील 3 दिवस अलर्ट, मुंबईत काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Weather Forecast: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठे बदल जाणवत आहेत. कोकणातील काही जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील हवामान स्थिती जाणून घेऊ.
advertisement
1/5

यंदा ऋतुचक्रात मोठे बदल जाणवत आहेत. अगदी दिवाळीपर्यंत पावसाने हजेरी लावली. आता थंडीचा जोर वाढत असतानाच पुन्हा हवमानात बदल जाणवत आहेत. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून कुठं थंडीचा कडाका वाढणार आहे.
advertisement
2/5
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पारा घसरत होता. परंतु, आता पुन्हा पारा चढण्याची शक्यता असून आद्रतेत देखील वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागेल.
advertisement
3/5
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुकं राहणार आहे. तर यानंतर आकाश निरभ्र होईल. मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
4/5
राज्यातील कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
5/5
दरम्यान, नोव्हेंबर महिना अर्ध्यावर आला तरी मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. 2 दिवसांपूर्वी किमान तापमान 20 अंशांपर्यंत खाली आलं होतं. परंतु, आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. आता 21 नोव्हेंबर नंतर तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज असून तोपर्यंत मुंबईसह उपनगरातील नागरिकांना थंडीची वाट पाहावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पुन्हा पाऊस, पुढील 3 दिवस अलर्ट, मुंबईत काय स्थिती?