लोणावळा-खंडाळा कशाला... मुंबईतल्या या ठिकाणी करा पावसाळी भ्रमंती! PHOTOS
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
Mumbai Tour Destinations : मुंबईचं जीवन धावपळीचं असतं. परंतु फॅमिली टाइम हवाच. त्यामुळेच मुंबईतच असणाऱ्या या पर्यटन स्थळांना फॅमिलीसोबत नक्की भेट द्या आणि सुट्टी एन्जॉय करा.
advertisement
1/5

संजय गांधी नॅशनल पार्क: बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्क हे सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. मूळ मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात एक विलक्षण अनुभव मिळतो. विविध प्रकारची झाडं, वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे.
advertisement
2/5
गोराई : इथला समुद्रकिनारा प्रचंड प्रसिद्ध आहे. बोरिवली आणि भाईंदरवरून तुम्ही इथं सहज जाऊ शकता. बोरिवली स्थानकात उतरल्यानंतर बस किंवा रिक्षानं गोराईला जाता येतं. तिथून गोराई किनाऱ्यावर जायला लॉंच असतात.
advertisement
3/5
रेड कार्पेट वॅक्स म्युझियम : कला, विज्ञान, राजकारण, क्रीडा, इत्यादी विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचे हुबेहूब पुतळे इथं पाहायला मिळतात. मुंबईतील घाटकोपरमध्ये हे ठिकाण आहे.
advertisement
4/5
किडझानिया : हे एक इनडोअर मनोरंजन पार्क आहे. इथं लहान मुलांसाठी शैक्षणिक करमणुकीसह अनेक क्रिएटिव्ह उपक्रम पाहायला मिळतात. खास लहान मुलांसाठी असलेलं हे ठिकाण घाटकोपरच्या आर-सीटी मॉलमध्ये आहे.
advertisement
5/5
छोटा काश्मीर <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबई</a> : जर जोडीदारासोबत प्रेमाचे क्षण घालवण्यासाठी निवांत ठिकाण शोधत असाल तर छोटा काश्मीर हे <a href="https://news18marathi.com/photogallery/mumbai/caves-in-mumbai-that-you-should-definitely-visit-in-monsoon-l18w-mpjm-mhij-1210550.html">सर्वोत्तम पर्यटनस्थळ</a> आहे. इथं <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/flowers-change-colours-after-15-days-valley-of-flowers-chamoli-uttarakhand-mhpl-1199093.html">सुंदर बाग</a> आणि एक सुरेख तलाव आहे. ज्यात तुम्ही बोटिंग करू शकता. गोरेगावच्या आरे कॉलनीत छोटा काश्मीर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
लोणावळा-खंडाळा कशाला... मुंबईतल्या या ठिकाणी करा पावसाळी भ्रमंती! PHOTOS