TRENDING:

Chandrayaan 3 : चंद्रावर लँडिंग करून 24 तास उलटताच चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट

Last Updated:
23 ऑगस्टला संध्याकाळी सहाच्या सुमारास चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग झालं. आता बरोबर 24 तासांनी तिथली महत्त्वाची माहिती आली आहे.
advertisement
1/5
Chandrayaan 3 : चंद्रावर लँडिंग करून 24 तास उलटताच चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट
चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगमुळे 23 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरला. <a href="https://news18marathi.com/tag/chandrayaan-3/">चांद्रयान 3</a> चंद्रावर उतरून 24 तास उलटले आहेत. आता चांद्रयानबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
advertisement
2/5
चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरवर रंभा, चास्टे, इल्सा, लेझर रेट्रोरिफ्लेक्टर हे चार तर प्रज्ञान रोव्हरमध्ये लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप, अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर हे दोन पेलोड्स आहेत.
advertisement
3/5
चांद्रयान 3 बाबत इस्रो प्रत्येक अपडेट देत आहे. सकाळी यानाच्या विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं. रोव्हरच्या माध्यमातून भारताने चंद्रावर पाऊल ठेवलं. रोव्हरने चंद्रावर वॉकही केला.
advertisement
4/5
इस्रोने सांगितलं की, सर्वकाही सुरळीत आहे. सर्व अॅक्टिव्हिटी ठरल्याप्रमाणेच आहेत. आता विक्रम लँडरमधील इल्सा, रंभा, चास्टे आज ऑन झाले आहेत. रोव्हरच्या हालचाली सुरू आहेत. प्रोप्युलशन मोड्युलवरील शेप पेलोड रविवारी चालू करण्यात आला आहे.
advertisement
5/5
चांद्रयानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर मिळून चंद्रावरील वायुमंडल, पृष्ठभाग, रसायन, भूकंप, खनिज यांचा तपास करेल. यामुळे इस्रोसह जगभरातील शास्त्रज्ञांना भविष्यात अभ्यासासाठी माहिती मिळेल आणि संशोधन करं सोपं होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Chandrayaan 3 : चंद्रावर लँडिंग करून 24 तास उलटताच चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल