IND vs SA : विश्वास ठेवला घात झाला! टीम इंडियाच्या 4 खेळाडूचा आफ्रिकेविरुद्ध फ्लॉप शो, स्कोर पाहून तुम्हीही शॉक व्हाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सध्या भारतीय अ संघ अनऑफिशिअल सामना खेळत आहे. हा सामना साउथ आफ्रिकेविरुद्ध खेळला जात आहे. अशातच आता काही खेळाडूंच्या फॉर्मवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
advertisement
1/7

सध्या भारतीय अ संघ अनऑफिशिअल सामना खेळत आहे. हा सामना साउथ आफ्रिकेविरुद्ध खेळला जात आहे. अशातच आता काही खेळाडूंच्या फॉर्मवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
advertisement
2/7
या सामन्यात भारताच्या दिग्गज आणि काही तरुण खेळाडूंची कामगिरी हे चर्चा विषय ठरत आहे. भारतचा 170/7 असा स्कोर आहे. आणि अशातच भारताचे काही उत्तम खेळाडू सुद्धा फ्लॉप ठरताना दिसत आहेत.
advertisement
3/7
बीसीसीआयने साउथ आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात पात्र खेळाडूंना डावलून काही तरुण खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ज्यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
advertisement
4/7
केएल राहुल - आयपीएलमध्ये स्वतःच फॉर्म सिद्ध करत राहुलने सर्वांची तोंड बंद केली होती पण, साउथ आफ्रिकेविरुद्ध राहुलची बॅट काही खास कामगिरी करू शकली नाही. राहुल स्वस्तात बाद झाला. त्याने 40 बॉल मध्ये फक्त 19 रन्स केले.
advertisement
5/7
साई सुदर्शन - साई सुदर्शन पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्याने 52 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 17 धावा केल्या, त्यात फक्त तीन चौकार मारले. पण आता प्रश्न असा आहे की साई सुदर्शन सतत फ्लॉप ठरत असूनही BCCI त्याचवर एवढा फिदा का?
advertisement
6/7
देवदत्त पड्डीकल - आरसीबीचा हिरो, आणि संपूर्ण IPL मध्ये उत्तम कामगिरी करणारा देवदत्त पड्डीकल देखील साउथ आफ्रिकेविरुद्ध फ्लॉप ठरला. त्याने 12 बॉल्समध्ये 5 रन्स केले आणि तो बाद झाला.
advertisement
7/7
ऋषभ पंत - साउथ आफ्रिका संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ एकमेकांसमोर आहेत. ऋषभ पंत भारतीय अ संघाचे नेतृत्व करत आहे. त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. पण या सामन्यात तो फार काही चांगली कामगिरी करू शकलेला नाही, त्याने 20 बॉल्समध्ये 24 रन्स केले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : विश्वास ठेवला घात झाला! टीम इंडियाच्या 4 खेळाडूचा आफ्रिकेविरुद्ध फ्लॉप शो, स्कोर पाहून तुम्हीही शॉक व्हाल