अनोखा जिल्हा, जिथं 10 वर्षात 5 कलेक्टर वर्षभरही टिकले नाही, पण काय आहे यामागचं नेमकं कारण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला एका अशा जिल्ह्याबाबत सांगणार आहोत, ज्याठिकाणी कलेक्टर जास्त दिवस टिकत नाही. हा जिल्हा असा आहे, ज्याठिकाणी मागील 10 वर्षात पाच जिल्हाधिकारी असे आहेत, जे एक वर्षही पूर्ण करू शकले नाहीत. अधिकाऱ्यांच्या बदलीची कारणे जरी वेगवेगळी असली तरी लोकांचे असे म्हणणे आहे की, याठिकाणचे वातावरणच असे आहे की, अधिकारी टिकत नाहीत. हा कोणता जिल्हा आहेत, हे कोणते अधिकारी आहेत, हे जाणून घेऊयात. (शिवकुमार, प्रतिनिधी)
advertisement
1/5

हा जिल्हा म्हणजे म्हणजे मध्यप्रदेशातील गुना हा जिल्हा. गुना येथे कलेक्टर म्हणून एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली होती. 13 मार्च 2020 रोजी त्यांनी पदभार स्विकारला आणि 17 जुलै 2020 रोजी त्यांची बदली करण्यात आली. जिल्ह्यात ते 5 महिन्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाही.
advertisement
2/5
यानंतर कुमार पुरुषोत्तम यांचे नाव येते. प्रशासकीय अधिकारी कुमार पुरुषोत्तम 17 जुलै 2020 ला कलेक्टर म्हणून गुना येथे आले आणि 8 मे 2021 पर्यंतच सेवा देऊ शकले. अशाप्रकारे त्यांनी फक्त 10 महिने जिल्ह्यात सेवा दिली.
advertisement
3/5
यासोबतच प्रशासकीय अधिकारी तरुण राठी यांचेही नाव यामध्ये येते. 31 जुलै 2023 मध्ये त्यांनी जिल्ह्याच्या पदभार स्विकारला आणि 28 डिसेंबर 2023 ला त्यांची बदली करण्यात आली. हेसुद्धा जिल्ह्याला जास्त वेळ नाही देऊ शकले आणि पाच महिने पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली.
advertisement
4/5
मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात 10 वर्षात कलेक्टर म्हणून सर्वात कमी कार्यकाळ राहिला तो म्हणजे अमन वीर सिंह. याठिकाणी ते फक्त 3 महिने राहिले यानंतर त्यांची बदली झाली.
advertisement
5/5
कलेक्टर विजय दत्ता यांचा कार्यकाळही फक्त 8 महिने राहिला. 18 एप्रिल 2018 मध्ये त्यांनी पदभार स्विकारला आणि 27 डिसेंबर 2018 ला त्यांची बदली करण्यात आली. या अधिकाऱ्यांच्या येण्या-जाण्यामागे काहीही कारण असले तरी गुना हा जिल्हा आता या बाबतीत नक्कीच प्रसिद्ध झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
अनोखा जिल्हा, जिथं 10 वर्षात 5 कलेक्टर वर्षभरही टिकले नाही, पण काय आहे यामागचं नेमकं कारण?