G20 Summit : G20 परिषदेची बात न्यारी अन् पंतप्रधान मोदी ते जो बायडन यांचा फोटो साडीवर आला भारी, PHOTOS पाहाच
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मोदींनी त्यांचा 'मन की बात' कार्यक्रमात उल्लेख केला होता. त्यानंतर हे कापड सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं.
advertisement
1/5

शनिवारी आणि रविवारी राजधानी दिल्लीत भारताच्या नेतृत्त्वात G20 शिखर परिषद पार पडली. जगभरातील प्रमुख देशांचे नेते, प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतापासून ते त्यांच्या जेवणापर्यंत सर्व गोष्टींची देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा झाली. या परिषदेला सलाम करण्यासाठी तेलंगणा राज्यातील विणकरांनी एक खास उपक्रम राबवला.
advertisement
2/5
तेलंगणाच्या सिरसिला भागातील एका दाम्पत्याने दोन मीटर लांबीच्या कापडावर G20 देशांच्या प्रमुखांच्या हुबेहूब प्रतिमा या कापडावर विणल्या. शिवाय भारतच नकाशा, G20चं लोगो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमाही या कापडावर आहे. हे आकर्षक कापड आणि त्यावरील सुबक नक्षीकाम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
advertisement
3/5
यल्दी हरिप्रसाद हे तेलंगणातील प्रसिद्ध विणकाम कारागीर आहेत. राजण्णा सिरिपट्टू प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण सिल्क साड्या ते बनवतात. G20 परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे आणि ही परिषद भारतात होणार आहे, याबाबत कळताच त्यांनी जागतिक स्तरावरील नेत्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करायचं ठरवलं.
advertisement
4/5
आधी या दाम्पत्याने G20साठी विणलेलं कापड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठवलं होतं. मोदींनी त्यांचा 'मन की बात' कार्यक्रमात उल्लेख केला होता. त्यानंतर हे कापड सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं.
advertisement
5/5
हरिप्रसाद यांनी म्हटलं, 'G20 देशांच्या प्रमुखांच्या प्रतिमा, G20चा लोगो, भारताचा नकाशा आणि पंतप्रधानांची प्रतिमा विणताना मला खूप अभिमान वाटला.'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
G20 Summit : G20 परिषदेची बात न्यारी अन् पंतप्रधान मोदी ते जो बायडन यांचा फोटो साडीवर आला भारी, PHOTOS पाहाच