Modi 3.0 Cabinet Minister List: PM मोदींनी या चौघांवर पुन्हा टाकला विश्वास! एकाचही बदललं नाही मंत्रालय, PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Modi 3.0 Cabinet Minister Portfolio: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 72 सदस्यीय मंत्रिमंडळाने रविवारी शपथ घेतली.
advertisement
1/8

शपथविधीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली (PM Modi First Cabinet Decisions). यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रालयाची विभागणी केली आहे.
advertisement
2/8
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते वाहतूक मंत्रालय मिळाले आहे. त्यांच्या मदतीसाठी अल्मोराचे खासदार अजय टमटा आणि दिल्लीचे खासदार हर्ष मल्होत्रा यांना मंत्री करण्यात आले आहे.
advertisement
3/8
भाजप नेते अमित शाह यांचं मंत्रालय बदलणार अशी चर्चा होती. मात्र, पुन्हा एकदा त्यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आलं आहे.
advertisement
4/8
एस जयशंकर यांच्याकडेही पूर्वीचं परराष्ट्रमंत्रालय देण्यात आलं आहे.
advertisement
5/8
अश्विनी वैष्णव यांच्याकडे अजस्त्र अशा रेल्वे मंत्रालयाचा कारभार सोपावण्यात आला आहे.
advertisement
6/8
नव्याने मोदींच्या मंत्रिमंडळात दाखल झालेल्या शिवराज सिंह चौहान यांच्याकडे महत्त्वाचं कृषी खातं देण्यात आलं आहे.
advertisement
7/8
तर अर्थ मंत्रालय पूर्वीप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आलं आहे. सीतारामन ह्या राज्यसभा खासदार आहेत.
advertisement
8/8
भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह पुन्हा एकदा संरक्षण खातं सांभाळताना पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Modi 3.0 Cabinet Minister List: PM मोदींनी या चौघांवर पुन्हा टाकला विश्वास! एकाचही बदललं नाही मंत्रालय, PHOTOS