TRENDING:

नीता अंबानी यांनी मुलांना भेटवस्तू आणि जेवण देऊन सेलिब्रेट केला वाढदिवस, पाहा PHOTO

Last Updated:
नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल (NMAJS) चे उद्घाटन बुधवारी म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी केलं. ही शाळा शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने गोडी निर्माण करेल अशी आशा आहे.
advertisement
1/5
नीता अंबानी यांनी मुलांना भेटवस्तू आणि जेवण देऊन सेलिब्रेट केला वाढदिवस, PHOTO
नीता अंबानी यांनी लहान मुलांसोबत खास वाढदिवस साजरा केला आहे. नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल (NMAJS) चे उद्घाटन बुधवारी म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी केलं. ही शाळा शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने गोडी निर्माण करेल अशी आशा आहे.
advertisement
2/5
या निमित्ताने रिलायन्स फाऊंडेशनने मुलांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी सुमारे 3 हजार शालेय विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांनी आपला 60 वा वाढदिवस मुलांसोबत सेलिब्रेट केला.
advertisement
3/5
वांद्रे-कुर्ला संकुलातील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (DAIS) कॅम्पसच्या शेजारी ही नवीन शाळा बांधण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुंदर अशी इमारत इथे उभारण्यात आली आहे. इतकेच नाही तर येथे विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. याशिवाय छोट्या-मोठ्या गटांमध्ये सहकार्य आणि काम करणेही या नवीन शाळेत असणार आहे.
advertisement
4/5
नीता अंबानी खरं तर मनापासून शिक्षिका आणि शिक्षक आहेत. संस्थापक आणि चेअरपर्सन म्हणून, नीता अंबानी प्रचंड उत्कटतेने आणि वचनबद्धतेने DAIS ला केवळ 20 वर्षांत जगातील सर्वोत्तम शाळांपैकी एक बनवू शकल्या आहेत.
advertisement
5/5
DAIS ने भारतातील नंबर 1 इंटरनॅशनल स्कूलची पदवी मिळवली आहे. त्यासोबतच DAIS ला जगातील सर्वोत्कृष्ट 20 IB शाळांच्या यादीतही स्थान देण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
नीता अंबानी यांनी मुलांना भेटवस्तू आणि जेवण देऊन सेलिब्रेट केला वाढदिवस, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल