Sonam Raghuvanshi : सोनमनचा राजासोबत अखेरचा व्हिडीओ समोर, लपूनछपून कुणाला Location पाठवत होती?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sonam Raghuvanshi Arrested : गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील एका ढाब्यावर सापडली आहे. अशातच आता या प्रकरणात (Indore Couple Missing Case) धक्कादायक खुलासा झालाय.
advertisement
1/7

शिलाँगमधून बेपत्ता झालेली सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये सापडली आहे. ती मेघालयातून बेपत्ता झाली होती. सोनमला गाझीपूरमधून अटक करण्यात आली आहे.
advertisement
2/7
सोनम वाराणसी-गाझीपूर मुख्य रस्त्यावरील काशी ढाब्यावर आढळली. तिला प्राथमिक उपचारांसाठी सदर रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि नंतर गाझीपूरमधील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.
advertisement
3/7
पण, जेव्हा सोनम राजासोबत शेवटची दिसली होती, तेव्हा ती सतत फोनवर कोणाशी तरी संपर्कात होती. सोहरा हॉटेलच्या बाहेर सोनमचा तो फोटो आहे, जेव्हा ती सतत फोनवर कोणाशी तरी संपर्कात होती.
advertisement
4/7
सोनम तिला आणि राजाचे लोकेशन कोणालातरी पाठवत होती, अशी माहिती समोर आली आहे. सोनमच्या सोबत अजून कोण कोण होतं? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
advertisement
5/7
सोनमच्या वडिलांनी पोलिसांचा दावा खोडून काढला आहे. पोलिसांच्या दाव्याची चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देखील सोनमच्या वडिलांनी केली आहे.
advertisement
6/7
इंदूरमधील बेपत्ता जोडप्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मृत राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम हिने उत्तर प्रदेशात आत्मसमर्पण केले आहे, असं मेघालयचे पोलिस महासंचालक इदाशिशा नोंगरांग यांनी सांगितलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, माझी मुलगी निर्दोष आहे. मला माझ्या मुलीवर विश्वास आहे. ती हे करू शकत नाही. माझी मुलगी स्वतःहून गाझीपूरला पोहोचली. तिला मेघालयात अटक करण्यात आली नाही, असं सोनमच्या वडिलांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Sonam Raghuvanshi : सोनमनचा राजासोबत अखेरचा व्हिडीओ समोर, लपूनछपून कुणाला Location पाठवत होती?